Breaking

Rashtriya swayamsevak sangh : भाजप नेत्यांच्या अपेक्षा, संघाने दिला सल्ला

RSS advises BJP leaders to achieve social harmony : समन्वय बैठकीला गडकरी, फडणवीस यांची उपस्थिती

Nagpur राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विदर्भातील नेत्यांची रविवारी समन्वय बैठक पार पडली. रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात झालेल्या या बैठकीत भाजप नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संघाकडून अपेक्षा व्यक्त केल्या. तर संघाने भाजप नेत्यांना सामाजिक समन्वय साधण्याचा सल्ला दिला.

या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यासोबत भाजपचे विदर्भातील आमदार उपस्थित होते. यावेळी भाजप नेत्यांनी संघासमोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा रोडमॅप मांडला. भाजप-संघादरम्यान नियमितपणे समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात येते. रविवारी झालेली भाजपची बैठक विदर्भ प्रांत स्तरीय असली, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता या बैठकीत भाजपच्या विदर्भातील सर्व आमदारांना बोलावण्यात आले होते.

School entrance : शाळा प्रवेशोत्सवाला मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत

यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा- संघ समन्वय बैठक अतिशय महत्त्वाची मानण्यात येते आहे.

Chhagan bhujbal : नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने पाठवा

संघाकडून विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, राम हरकरे, कार्यवाह अतुल मोघे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. भाजप नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या समन्वय बैठकीत भाजप कार्यकर्त्यांच्या अपूर्ण टास्कवरून कानपिचक्या देण्यात आल्या. गडकरी आणि फडणवीसांकडून कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी त्रुटी व उणिवांची जाणीव करून देण्यात आली. तसेच येत्या ३ महिन्यात काय-काय करायचे आहे यावर प्रकाश टाकण्यात आला.

The bridge collapsed : मावळात पूल कोसळून दोन ठार, काही वाहून गेले, एनडीआरएफला पाचारण !

 

एकीकडे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी नियोजनाबाबत माहिती दिली. तर संघाकडून समाजातील कोणत्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या बैठीकत संघाने गेल्या काही कालावधीतील राजकीय व सामाजिक स्थितीच्या केलेले सूक्ष्म निरीक्षण भाजप नेत्यांसमोर मांडले.