Breaking

Akola Zilla Parishad : जिल्हा परिषदेतील काम वाटपात अनियमितता, जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार?

Irregularities in work distribution in Zilla Parishad : वंचित बहुजन युवा आघाडीचा आरोप, सीईओंना निवेदन

Akola जिल्हा परिषद बांधकाम विभागात कामवाटपाच्या प्रक्रियेत अनियमितता, जलजीवन मिशनअंतर्गत झालेला भ्रष्टाचार तसेच खाजगी शाळांमार्फत पालकांची आर्थिक लूट या मुद्द्यांवर वंचित बहुजन युवा आघाडीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांना निवेदन दिले.

बांधकाम विभागात काही अधिकारी व विशिष्ट कंत्राटदार यांच्यातील संगनमतामुळे लहान कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि मजूर सोसायट्यांना काम मिळत नाही. ५० हजार ते १ लाख रुपयांच्या आत कामे देऊन बोळवण केली जाते, तर मोठी कामे विना निविदा किंवा निविदा व्यवस्थापन करून निवडक ठेकेदारांनाच मिळतात. ई-निविदा प्रक्रियेतही एकाच आयपी अ‍ॅड्रेसवरून सर्व टप्पे पार पाडल्याचे आरोप निवेदनात करण्यात आले.

Bacchu Kadu : बच्चू कडू यांना ‘सहकार’ने ठरवले अपात्र, हायकोर्टात मिळणार का न्याय?

जलजीवन मिशन घोटाळा :
१५,८६७ कोटी रुपयांची जलजीवन योजना असून आतापर्यंत १३,०५२ कोटी खर्च झाले आहेत. २८४ पैकी फक्त ११२ योजना पूर्ण झाल्या असूनही अनेक गावांमध्ये पाणी पोहोचलेले नाही. योजनेअंतर्गत शाश्वत पाणी स्रोत नसताना वितरण यंत्रणा उभारण्यात आली असून बिलांची उकल झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. प्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.

जिल्ह्यातील अनेक खासगी शाळांमध्ये पालकांना गणवेश, पुस्तकं आणि साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे पालकांची लूट होत असून शिक्षण विभागाने यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

Uddhav Thackeray group : दोन दिवसांत तोडगा निघाला नाही तर कार्यालयाला टाळं ठोकू

या वेळी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी चौकशीची मागणी केली. यावेळी श्रीकांत घोगरे, राजकुमार दामोदर, वैभव खडसे, सचिन शिराळे, जय तायडे, आकाश गवई, सूरज दामोदर, नागेश उमाळे, विजय पातोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.