16 thousand farmers in Akola district get daytime electricity : नांदखेडा सौर प्रकल्पामुळे सौर ऊर्जानिर्मितीत ५ मेगावाॅटने वाढ
Akola मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा आणि शाश्वत वीजपुरवठा सुरू झाला असून, या योजनेला आता गती मिळाली आहे. महावितरणच्या बाळापूर उपविभागातील नांदखेडा सौर प्रकल्प सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील सौर ऊर्जानिर्मितीत आणखी ५ मेगावाॅटने वाढ झाली आहे.
या प्रकल्पामुळे ३३ केव्ही कान्हेरी गवळी उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या एकूण १,११० शेतीपंपांना दिवसा आणि शाश्वत वीजेची सोय झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्थिर आणि वेळेवर वीज मिळू लागली आहे.
दरम्यान, दि. ११ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रेडावा (२ मेगावाॅट) आणि भेंडीमहाल (१० मेगावाॅट) या दोन सौर प्रकल्पांचे लोकार्पण झाले. बाळापूर तालुक्यातील नांदखेडा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे जिल्ह्यात एकूण ११ सौर प्रकल्प सुरू झाले आहेत. यामधून एकूण ५५ मेगावाॅट सौरऊर्जा निर्मिती होत असून, त्याचा लाभ १६ हजार शेतकऱ्यांना मिळत आहे.
Chandrashekhar Bawankule : नागरिकांचे मुलभूत प्रश्न तात्काळ मार्गी लावा; अधिकाऱ्यांना कानपिचक्या
या योजनेअंतर्गत महावितरणकडून विकेंद्रित स्वरूपाचे सौर प्रकल्प उभारले जात आहेत. ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला आणि महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक श्री लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेला राज्यभरात वेग मिळत आहे.
नांदखेडा सौर प्रकल्प २५ एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आला असून, मुख्य अभियंता राजेश नाईक आणि अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर यांच्या देखरेखीखाली मेघा इंजिनिअरिंग या विकासक कंपनीमार्फत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. प्रकल्पाच्या कार्यान्वयनावेळी कार्यकारी अभियंता गोरक्षणाथ सपकाळे आणि मदन नानोटकर उपस्थित होते.
Pravin Mane : हर्षवर्धन पाटलांचा कार्यक्रम? इंदापुरात मोठा मासा फडणवीसांच्या गळाला!
सौरऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे हे केवळ शेतीसाठी उपयुक्त नसून पर्यावरणपूरक व दीर्घकालीन उपाय असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.