Hearing on appointment dispute postponed : कॅटने पुढील सुनावणी ४ जुलैपर्यंत पुढे ढकलली
Buldhana जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदावर सुरू असलेल्या वादात अद्यापही कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नाही. गुरुवारी (२७ जून) कॅट – केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात सुनावणी होणार होती. मात्र शासनाच्या वकिलांकडून आवश्यक कागदपत्रे सादर न झाल्याने, सुनावणी पुढे ढकलत ४ जुलै ही नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या बदलीविरोधात त्यांनी कॅट न्यायालयात स्थगनाची मागणी केली होती. न्यायाधिकरणाने त्यावर अंतरिम स्थगन आदेश दिला. त्याचदरम्यान शासनाने नवीन पोलिस अधीक्षक म्हणून नीलेश तांबे यांची नियुक्ती केली, आणि त्यांनी पदभारही स्वीकारला. त्यामुळे बुलढाण्यात एकाच पदावर दोन अधिकार्यांची स्थिती निर्माण झाली आहे.
Ashish shelar : आशिष शेलारं यांनी काढली संजय राऊत यांची ‘औकात’
या अनोख्या आणि गुंतागुंतीच्या स्थितीमुळे जिल्हा प्रशासनात गोंधळाचे वातावरण असून, कायदा-सुव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवारची सुनावणी निर्णायक ठरेल, अशी अपेक्षा होती. परंतु, कागदपत्रे सादर करण्यात आलेली नसल्याने पुन्हा एकदा तारीख पुढे गेली. वरिष्ठ पातळीवरही या परिस्थितीबाबत संभ्रम आहे, अशी चर्चा पोलिस दलात सुरू आहे.
Dr. Rajendra Shingne : पराभवाने खचून जाऊ नका, नव्याने तयारीला लागा!
आता ४ जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी शासनाच्या वकिलांकडून सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करून या प्रकरणात स्पष्टता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








