Farmers suicide : न्यायासाठीचा अन्नत्याग; स्वाती नागरे यांचे आंदोलन सुरू

Farmer’s widow protests against the government : सरकारचे आश्वासन हवेत; झुंजार शेतकरी मंचचा पाठींबा

Buldhana अंढेरा परिसरातील जलसिंचनाच्या मागणीसाठी बलिदान दिलेल्या युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे Kailash Nagare यांच्या पत्नी स्वाती नागरे यांनी, प्रशासनाच्या वचनभंगाविरोधात आजपासून शिवणी आरमाळ येथे पतीच्या प्रतिमेजवळ अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

१३ मार्च रोजी केलेल्या बलिदानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरे यांच्या मुलांना दत्तक घेण्याची घोषणा विधानसभेत केली होती. शिक्षण व आरोग्याची सर्व जबाबदारी शासन घेईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही शासकीय मदत मिळालेली नाही, असा आरोप स्वाती नागरे यांनी निवेदनात केला आहे.

Buldhana Police : ऐकावे ते नवलच! हरवलेले १७७ मोबाईल सापडले!

स्व. कैलास नागरे यांनी शेवटच्या निवेदनात उल्लेख केलेल्या १४ गावांच्या शेतीसाठी धरणातून पाणीपुरवठा करण्याची मागणीही अद्याप रखडली आहे. “मी एकटी स्त्री असून, मुलांचा सांभाळ, शेती आणि पतीच्या बलिदानासाठीचा लढा एकहाती लढते आहे. आता तरी निर्णय घेणाऱ्यांनी जागे व्हावे,” अशी भावनिक प्रतिक्रिया स्वाती नागरे यांनी दिली.

या आंदोलनाला झुंजार शेतकरी मंचचा पाठींबा मिळाला आहे. मंचने शासनाला नागरे कुटुंबाला तातडीने मदत देण्याचे आणि प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

Public Safety bill : काँग्रेसचे नेते म्हणतात, जनसुरक्षा कायदा म्हणजे हुकूमशाहीचा पोशाख

आत्महत्येनंतरचे प्रश्न
कैलाश नागरे यांनी सरकार व प्रशासनाच्या उदासीनतेला कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. सरकारला धारेवर धरण्यात आले. या विषयावर विरोधकांनी आंदोलन देखील केले. पण अद्याप सरकारने प्रश्न मार्गी लावलेले नाही. दुर्दैवाने नागरे यांच्या पत्नीवर आंदोलनाची वेळ आली आहे.