Benefits of more than 26 million Ladiki Bahin temporarily closed : 26 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींचा लाभ तात्पुरता बंद !
Mumbai : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या मासिक लाभाचा अनेकांनी गैरवापर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यभरातील 28.34 लाख महिलांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आली होती. त्यातून महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे महायुती सरकारनेही महिलांचे आभार मानले. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या वाढल्याने तपासणीस सुरुवात झाली.
महिला व बालविकास विभागाने जून महिन्यापासून योजनेतील अर्जांची तपासणी सुरू केली. त्यात अनेक महिला इतर सरकारी योजनांचाही लाभ घेत असल्याचे आढळले. लाडकी बहीण योजनेचा नियम आहे की, लाभार्थिनी फक्त याच योजनेचा लाभ घेणारी असावी. इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत असल्यास त्या महिलेला लाडकी बहिण योजनेत अपात्र ठरवले जाते.
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. त्यानुसार, माहिती व तंत्रज्ञान विभागाने अन्य शासकीय योजनांचे लाभार्थी तपासून सुमारे 26.34 लाख महिलांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे त्यांचा मासिक लाभ सध्या थांबवण्यात आला आहे.
Ladiki Bahin Yojana : लाडकी की लबाडी? हजारो अपात्र लाभार्थींचा पर्दाफाश !
तपासणीचा पुढील टप्पा लवकरच पार पडणार असून अजून काही महिलांना अपात्र ठरवले जाऊ शकते. तरी, सरकारने स्पष्ट केले आहे की योजना बंद होत नाही, लाभ फक्त पात्र महिलांनाच दिला जाणार आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेबाबत अधिक पारदर्शकता आणि काटेकोर अंमलबजावणीची गरज अधोरेखित झाली आहे.
_____








