Kirit Somaiya : वर्षभरात १० लाख रोहिंग्यांना बनावट जन्म प्रमाणपत्र?

Fake birth certificates to 1 million Rohingyas in a year? : किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप; अकोल्यातील ६१२२ प्रकरणांची चौकशी सुरू

Akola देशभरात गेल्या एक वर्षात सुमारे १० लाख रोहिंग्या मुस्लीमांना बनावट जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा खळबळजनक दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा केला आहे. अकोला जिल्ह्यातील अशा ६ हजार १२२ प्रमाणपत्रांची नोंद असून, त्यातील काही प्रमाणपत्रे प्रशासनाकडून रद्द करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोमय्या यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिकारी अजित कुंभार, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा निबंधक डॉ. आशिष निहोते आदी अधिकाऱ्यांसोबत या प्रकरणाबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे संशयास्पद प्रमाणपत्रांबाबत माहिती सादर केली आणि पुढील कारवाईची मागणी केली.

सोमय्या म्हणाले, “जिल्ह्यात १५ हजार ८४५ जन्म प्रमाणपत्रे तपासणीसाठी पाठवण्यात आली असून, त्यातील ६१२२ प्रकरणांमध्ये अनियमितता आढळली आहे. यापैकी सुमारे २ हजार प्रमाणपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित प्रमाणपत्रांची चौकशी सुरू आहे. यातील अनेक प्रकरणे रोहिंग्यांशी संबंधित असल्याचा संशय आहे.”

Ajit Pawar writes letter to Nitin Gadkari : पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवा, अजितदादांचे गडकरींना साकडे!

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, अनेक बनावट प्रमाणपत्रे परत घेण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यातील काही नायब तहसीलदारांनी अधिकार नसतानाही मोठ्या प्रमाणात जन्म प्रमाणपत्रे जारी केली आहेत.

Vidarbha Farmers : सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी भूमिपुत्रांचा आक्रमक मोर्चा

अकोला जिल्ह्याचा बोगस प्रमाणपत्र वाटप प्रकरणात राज्यात दुसरा क्रमांक लागतो, असा आरोपही सोमय्यांनी यावेळी केला. त्यांनी याआधी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील असेच प्रकरणे उघडकीस आणले असल्याचे नमूद केले. जिल्हा प्रशासनाकडून यापैकी सुमारे १५० प्रमाणपत्रे आधीच रद्द करण्यात आली असून, उर्वरित प्रकरणांबाबतही निर्णय प्रक्रियेत असल्याची माहिती मिळाली आहे.