Tariffs increased, oil deal with Pakistan : टॅरिफ वाढवले, पाकिस्तानसोबत तेल करार
New Delhi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकाच दिवशी भारतावर दोन मोठे निर्णय घेतले आहेत. एका बाजूला त्यांनी भारतातून होणाऱ्या आयातीवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, तर दुसऱ्या बाजूला भारताचा शत्रू मानला जाणारा पाकिस्तानसोबत अमेरिकेने मोठा तेल करार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि व्यापारसंबंधात मोठा संदेश गेला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर हा खुलासा केला आहे. त्यांनी लिहिले की, अमेरिकेने पाकिस्तानसोबत एक मोठा करार केला असून, त्यांचं तेल भांडार विकसित करण्यासाठी अमेरिकन कंपन्या थेट सहभागी होणार आहेत. लवकरच या करारासाठी एका मोठ्या तेल कंपनीची निवड केली जाणार आहे. ट्रम्प यांनी हे देखील म्हटले की, कदाचित भविष्यात पाकिस्तान भारतालाही हे तेल विकू शकेल.
Action against officer : शासकीय फायलींवर बारमध्ये सह्या करणे भोवले !
या घोषणेमुळे भारतात आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली जात आहे. कारण ट्रम्प यांनी याचवेळी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची जाहीर घोषणा केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारसंबंधांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. भारत रशियाकडून स्वस्त दरात कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणावर आयात करत आहे. हेच एक कारण ट्रम्प यांनी स्पष्टपणे मांडले आहे. त्यांनी म्हटले की, भारत रशियाशी केवळ तेलच नव्हे तर शस्त्रास्त्र खरेदीसाठीही मोठा व्यापार करत आहे, जो अमेरिकेसाठी घातक आहे.
Fuel discount for ST : सवलत दरात प्रति लिटर 30 पैसे वाढ, वर्षाला 12 कोटी वाचणार !
ट्रम्प यांनी भारताच्या ब्रिक्समधील सहभागावरही आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले की, ब्रिक्स ही संघटना अमेरिकन डॉलरच्या विरोधात काम करत आहे आणि मी हे सहन करणार नाही. भारत ब्रिक्सचा भाग असल्यामुळे अमेरिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे भारतासोबत सध्या जे व्यापारिक चर्चा सुरू आहेत, त्या कठीण होण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी 2022 पासून भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी सुरू केली. युक्रेन युद्धानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध टाकले आणि रशियाकडून तेल खरेदी थांबवली. परंतु भारताने राष्ट्रीय गरज लक्षात घेऊन रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी सुरू ठेवली. पूर्वी भारताच्या एकूण तेल आयातीत रशियाचा वाटा १ टक्क्याच्या खाली होता. आता तो एकतृतीयांशाच्या जवळपास पोहोचला आहे. ट्रम्प यांना हीच गोष्ट खटकली असून त्यातून त्यांनी भारतावर टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Last day for E-KYC : तर ४.८८ लाख लाभार्थ्यांचे रेशन होणार बंद!
ट्रम्प यांचे हे दोन्ही निर्णय एकीकडे टॅरिफ वाढवणे आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत तेल करार हे भारतासाठी एक स्पष्ट राजकीय आणि आर्थिक इशारा मानला जात आहे. भारत सरकारकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र येत्या काळात या निर्णयांचा परिणाम भारत-अमेरिका संबंधांवर कसा होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, असे जाणकारांचे मत आहे.








