Government considering increasing subsidy for Ladki Bahin Scheme to Rs. 2,100 : शेतकऱ्यांना कर्जमाफीची हमी; मात्र फक्त गरजूंनाच लाभ
Chikhli राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निवडणुकीपूर्वी दिलेली हमी असून, ती लांबणीवर नाही तर नियोजनबद्ध रितीने अंमलात आणली जाणार आहे. मात्र सरसकट माफीऐवजी फक्त गरजू व गरीब शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळेल, असे स्पष्ट विधान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. पात्र शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी सरकारने विशेष समिती नेमल्याची माहिती त्यांनी दिली.
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर चिखलीत महाराष्ट्रातील पहिल्या ‘देवाभाऊ लाडकी बहीण’ पतसंस्थेचे उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, माजी आमदार तोताराम कायंदे, शशिकांत खेडेकर, सतीश गुप्त, विजय कोठारी, सुरेशअप्पा खबुतरे आदी मान्यवर उपस्थित होते.
Gopinath Munde : मुंडे साहेबांना मुख्यमंत्री करण्याचा विचार केला होता
या पतसंस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश आमदार श्वेता महाले यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केला. आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही संकल्पना मांडण्यात आली होती. केवळ १५ दिवसांत राज्यातील पहिली शाखा सुरु झाल्याबद्दल ना. बावनकुळे यांनी महाले यांचे कौतुक केले आणि “महाले यांचा कोणताही प्रस्ताव सरकारकडून परत जात नाही,” असे नमूद केले.
बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुढील पाच वर्षांत लाडकी बहीण योजनेचे मासिक अनुदान १५०० वरून २१०० रुपये करण्याचा विचार करत आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना वीजबिलातून मुक्तता देण्यासाठीही पावले उचलली जातील, असा संकेत त्यांनी दिला.








