Sharap Pawar NCP : अवैध सावकारांना पोलिसांचे संरक्षण, राष्ट्रवादीचा आरोप

NCP alleges that illegal moneylenders are being protected by the police : युवा शेतकरी आत्महत्येप्रकरणी व्यक्त केला संताप

Khamgao मांडका (ता. खामगाव) येथील २७ वर्षीय युवा शेतकरी शिवाजी सातव यांनी अवैध सावकाराच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने केला आहे. याप्रकरणी पोलिस अवैध सावकाराला पाठीशी घालत असल्याचा आरोपही करण्यात आला.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय बगाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अवैध सावकार विपुल गायगोळ व शुभम गायगोळ — हे दोघे स्थानिक तलाठ्याचे पुतणे असून, तलाठ्याचेच पैसे अवैध सावकारी व्यवसायात गुंतवले जात आहेत. या अवैध सावकारांनी मृतकाच्या शेतातून उभी म्हैस व्याजाच्या पैश्यासाठी उचलून नेली, ही धक्कादायक बाब आहे. या मानसिक छळामुळेच शिवाजी सातव यांनी आत्महत्या केली.

Uddhav Balasaheb Thackeray : रमी खेळणाऱ्या, अघोरी पूजा करणाऱ्या मंत्र्यांना हाकला

बगाडे म्हणाले, “आरोपींवर सदोष मनुष्यवध व सावकारी कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करावी, आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे आर्थिक पुनर्वसन व्हावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन उभारेल.”

यावेळी ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. संतोष तायडे, विधानसभा अध्यक्ष थोडीराम खंडारे, गजानन धंदरे, कार्याध्यक्ष संतोष पेसोडे, डॉ. रावनकार, आशिष ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, ‘लाडकी बहीण’चे अनुदान २१०० रुपये करण्याचा विचार

मृतकाच्या कुटुंबीयांनीही पोलिसांवर गंभीर आरोप करताना सांगितले की, २००६ साली शिवाजी यांच्या वडिलांनीही कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. आज पुन्हा त्याच परिस्थितीत मुलाचा जीव गेला, तरी पोलिस आरोपींना संरक्षण देत आहेत. तक्रार असूनही कार्यवाही होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.