Rahul Gandhi : “माझ्या जीवाला धोका” नेत्यांच्या धमक्यांचाही उल्लेख

 

Rahul Gandhi’s big claim in Pune court
न्यायालयात राहुल गांधींचा मोठा दावा

Pune: स्वातंत्र्यवीर सावरकरांविरुद्ध केलेल्या कथित बदनामीच्या आरोपांवरील खटल्याच्या सुनावणीत काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात लेखी माहिती सादर करून जीवाला गंभीर धोका असल्याचा दावा केला.   राहुल गांधींचे वकिल मिलिंद पवार यांनी न्यायालयात दिलेल्या निवेदनानुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतचोरीचा मुद्दा मांडल्याने राजकीय तणाव वाढला असून, त्यातून त्यांच्यावर वैयक्तिक सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, भाजप नेते तरविंदर मारवा यांनी राहुल गांधींना धमकी देत म्हटले होते की, “ते नीट वागले नाहीत, तर त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्यासारखे होईल.” तर आणखी एका भाजप नेत्याने त्यांना ‘देशाचा नंबर वन दहशतवादी’ असे संबोधले आहे.

Protest in university : शिक्षणाच्या मंदिरांना राजकारणापासून दूर ठेवण्याची मागणी

या प्रकरणातील तक्रारदार सत्यकी सावरकर यांचा नथुराम गोडसे घराण्याशी असलेला नातेसंबंध, तसेच सध्याचे धार्मिक आणि राजकीय वातावरण लक्षात घेता, जीवाला धोका अधिक वाढल्याचे राहुल गांधींचे म्हणणे आहे. याशिवाय, खटला दाखल करणाऱ्यांचा हेतू धार्मिक वातावरण दूषित करणे, समाजात तेढ निर्माण करणे आणि ठराविक उद्योजकांचे हित साधणे असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

Maharashtra politics : महायुती सरकारला मित्रपक्षांच्या वादग्रस्त नेत्यांचा फटका

राहुल गांधींनी भारतीय न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याबद्दल आदर व्यक्त करताना, खटला सुरू असताना बाहेरील दबाव आणि असामान्य परिस्थिती न्यायालयाने लक्षात घ्यावी, अशी विनंती केली आहे. तसेच हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या जहालमतवादी गटांकडून त्यांना धोका असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.

या पार्श्वभूमीवर, आता विशेष न्यायालय या सुरक्षा मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

_____