Another blow from the High Court to Dhananjay Munde ; धनंजय मुंडेंना हाय कोर्टाचा आणखी एक दणका
Chhatrapati Sambhaji Nagar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे ते चर्चेत आहेत, आणि आता औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या ताज्या आदेशामुळे त्यांच्यावर आणखी दबाव आला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव समोर आल्यानं मुंडेंच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यानंतर आरोग्याच्या कारणांमुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या प्रकरणानंतर करुणा शर्मा यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे ते पुन्हा चर्चेत आले. आता हाय कोर्टाच्या आदेशामुळे त्यांच्या विरोधातील कायदेशीर संकट अधिक गडद झाले आहे.
Local body elections ! युती झाली किंवा नाही झाली तरी 100 पार !
औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात दाखल दोन निवडणूक याचिकांमध्ये शेवटची संधी देऊनही त्यांनी लेखी उत्तर न दिल्याने प्रत्येकी पाच हजार रुपये अशी दहा हजार रुपयांची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम वकील संघास जमा करण्यास सांगितले आहे. न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी नुकत्याच झालेल्या सुनावणीवेळी हा निर्णय दिला.
Independence Day : ‘सुटी नव्हे उत्सव साजरा करू या’, फुटाळा तलावावर गरजले राष्ट्रप्रेमाचे वादळ !
या दोन याचिका राजाभाऊ फड आणि करुणा शर्मा यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील मुंडे यांच्या निवडीला आव्हान देत दाखल केल्या होत्या. यामध्ये बोगस मतदान, शपथपत्रात खोटी माहिती देणे आणि माहिती दडवून ठेवण्याचे आरोप करण्यात आले आहेत. नोटीसा देऊनही आणि त्या प्राप्त झाल्यानंतरही मुंडेंनी लेखी उत्तर सादर केले नसल्यामुळे न्यायालयाने ही कारवाई केली आहे.
____








