व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण १२५ जिल्ह्यांत नक्षलवादाचा विळखा, तत्कालीन सरकारे गप्प का होती?

१२५ जिल्ह्यांत नक्षलवादाचा विळखा, तत्कालीन सरकारे गप्प का होती?

मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल; गडचिरोलीतून विरोधकांना लक्ष्य

Gadchiroli : देशातील नक्षलवाद आणि माओवादाचे कंबरडे मोडण्यात केंद्र सरकारला यश आले असून, आता आदिवासीबहुल भागांमध्ये विकासाची नवी गंगा पोहोचत आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. याचवेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार राजकीय निशाणा साधत देशातील १२५ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव असताना तत्कालीन सरकारे मौन का बाळगून होती, असा सवाल उपस्थित केला. आदिवासी समाजाच्या वेदना आणि समस्यांकडे पूर्वीच्या सरकारांनी दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी केला.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी उलगुलान आंदोलनापासून प्रेरणा घेत देशातून नक्षलवाद आणि माओवाद संपविण्याची लढाई यशस्वी केल्याचे सांगितले. देशातील आदिवासी समाजासाठी विविध विकास योजनांची अंमलबजावणी आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावरही त्यांनी भर दिला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, एकेकाळी देशातील सुमारे १२५ जिल्हे नक्षलवादाच्या प्रभावाखाली होते. आदिवासी समाज संकटात असताना तत्कालीन सरकारांनी पुरेशी ठोस भूमिका घेतली नाही. नक्षलवादी चळवळीच्या नावाखाली अल्पवयीन मुलांना भरकटवून हिंसाचाराच्या मार्गावर नेले जात होते. मात्र, आता नक्षलवादाचे कंबरडे मोडण्यात आले असून, या बदलामुळे आदिवासी माता-भगिनींकडून सरकारला आशीर्वाद मिळत आहेत.

नक्षलवाद संपविणे हे स्वातंत्र्यानंतरच्या काळातील मोठ्या यशांपैकी एक असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यंदा बस्तरमध्ये दिवाळी साजरी केल्याचा उल्लेख करत त्यांनी नक्षलवादाच्या छायेतून बाहेर पडणाऱ्या आदिवासी भागांमध्ये नव्या सुरुवातीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले.

रब्बी पिकांसाठी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक !

गेल्या बारा वर्षांत आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकारने विविध प्रभावी योजना राबविल्याचा दावा मोदी यांनी केला. चार कोटी पक्क्या घरांची निर्मिती, आदिवासींचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजना आणि शिक्षणासह मूलभूत सुविधांचा विस्तार यामुळे आदिवासी समाजासाठी प्रगतीची दारे खुली झाल्याचे ते म्हणाले.

जागतिक बँकेच्या अहवालाचा संदर्भ देत देशातील सुमारे ५० कोटी नागरिक गरिबीच्या रेषेबाहेर आल्याचा दावाही त्यांनी केला. पूर्वी परकीय व्यक्तींच्या नावाने दिन साजरे केले जात होते; मात्र आता देशातील महान आदिवासी स्वातंत्र्यवीरांच्या योगदानाचा गौरव केला जात आहे, असे सांगत त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केले.

जनजातीय गौरव दिनानिमित्त अरुणाचल प्रदेश, मिझोराम, महाराष्ट्रासह देशातील विविध आदिवासीबहुल भागांमध्ये विकासकामे आणि सुविधांचे लोकार्पण करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.

या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आदिवासी विकासमंत्री जुएल ओराम, राज्याचे आदिवासी मंत्री, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

उमरखेडमध्ये काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीवर भर

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा राष्ट्रीय सोहळा गडचिरोलीत आयोजित करून आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देतानाच पंतप्रधान मोदी यांनी नक्षलवादाच्या प्रश्नावरून काँग्रेसला लक्ष्य केले. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ आदिवासी विकासाच्या योजनांपुरता मर्यादित न राहता केंद्र सरकारच्या कामगिरीचा आणि विरोधकांवरील राजकीय टीकेचा महत्त्वपूर्ण मंच ठरला.

error: Content is protected !!