व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Mahayuti Government: सरकारला दुष्काळ दिसलाच नाही; शेतकरी हवालदिल

Mahayuti Government: सरकारला दुष्काळ दिसलाच नाही; शेतकरी हवालदिल

The government has never seen a drought : शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा निराशाच

Wardha यंदाच्या खरीप हंगामात निसर्ग कोपाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. कधी पावसाची हुलकावणी, तर कधी अतिवृष्टीने शेतशिवार खरडून गेले. यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांना चांगलाच फटका बसला. या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना शासनाकडून काही तरी आधार मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु प्रशासनाला ही दुष्काळी परिस्थिती दिसलीच नसल्याने अंतिम पैसेवारीतून त्यांनी सुकाळच दर्शविल्याने मदतीची आशा आता धूसर झाली आहे.

खरिपाच्या लागवडीनंतर प्रशासनाकडून प्राथमिक, सुधारीत व अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. नुकताच डिसेंबरच्या अखेरीस जिल्हा प्रशासनाकडून १ हजार ३३९ गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली. या सर्व गावांची पैसेवारी ही ६४ पैसे काढण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील २० गावांची पैसेवारी ८० पैसे जाहीर झाली आहे. पावसाची हुलकावणी आणि अतिवृष्टीमुळे सेलू, देवळी, आष्टी व हिंगणघाट या चार तालुक्यांना जबर फटका बसला होता. ऑगस्ट, ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात झालेल्या आतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक खरडून गेले होते.

Local body elections : अकोल्यासह ६ जिल्हा परिषदांमध्ये येणार प्रशासक राज ?

त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. परंतु जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अंतिम पैसेवारीत जिल्ह्यातील एकाही गावाची पैसेवारी ही ५० पैशाच्या आत आलेली नाही. त्यामुळे अतिवृष्टीने झालेली नुकसानभरपाई मिळण्याची तीळमात्र शक्यता राहिली नसल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या नशिबी निराशाच आल्याची भावना व्यक्त होत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने १ हजार ३८७ गावांपैकी १ हजार ३३९ गावांची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबरला जाहीर केली आहे. त्यामध्ये सर्वांत कमी आर्वी तालुक्यातील २०८ गावांची पैसेवारी ५५ पैसे निघाली आहे. तसेच कारंजा तालुक्यातील १२० व देवळी तालुक्यातील १५० गावाची पैसेवारी प्रत्येकी ५७ पैसे काढण्यात आली. त्यापाठोपाठ हिंगणघाट तालुक्यातील १८७ गावांची पैसेवारी ६१ पैसे, सेलू तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६२ पैसे काढण्यात आली.

CM DEVENDRA FADNAVIS : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मेडिकलचे वसतिगृह पडद्यात लपविले !

समुद्रपूर तालुक्यातील २१९ गावांची पैसेवारी ६८ पैसे, आष्टी तालुक्यातील १३५ गावांची पैसेवारी ७४ पैसे व सर्वांत जास्त वर्धा तालुक्यातील १५४ गावाची पैसेवारी ७९ पैसे काढण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ३३९ गावांची सरासरी अंतिम पैसेवारी ६४ पैसे काढण्यात आली आहे.

error: Content is protected !!