Nana Patole : फडणवीसांना दिल्लीत पाठवण्याची तयारी चाललीय का ?

Is BJP preparing to send Devendra Fadnavis to Delhi : निवडणूक दिल्लीत होणार आहे, आत्तापासून जबाबदारी देण्याचा कार्य अर्थ

Nagpur : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक दिल्लीत होणार आहे. त्याला आणखी अवकाश आहे. पण आत्तापासूनच देवेंद्र फडणवीसांवर या निवडणुकीची जबाबदारी का सोपवली, हा खरा प्रश्न आहे. आता भाजप देवेंद्र फडणवीसांना थेट मोदींच्या जागेवर बसवत असेल तर माहिती नाही. फडणवीसांना दिल्लीत पाठवण्याची तयारी चालली आहे का, असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला.

नागपुरात आज (२१ ऑगस्ट) आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोलेंनी निवडणूक आयोगावर पुन्हा ताशेरे ओढले. ते म्हणाले निवडणूक आयोगावर आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आयोगाने अनेकदा चुकीचे ट्विट केले. मतदानाच्या दिवशी अनेक वेळा मतदानाची टक्केवारी बदलवली. मतदानाच्या अखेरच्या टप्प्याचे फुटेज मागितले, तर म्हणतात की आया बहीणींची इज्जत जाईल, याचा काय संबंध आहे..? संजय कुमार यांच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर आयोग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजे. जो कुणी ‘अनपढ कुमार’ निवडणूक आयोगात आलेला आहे, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना प्रचंड वेग !

पूरपरिस्थितीबाबत विचारले असता, गेल्या काही दिवसांत पुराने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांची पिके उद्धवस्त झाली आहेत, घरांचे, गुरा ढोरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मागील वेळेच्या ओल्या दुष्काळाची मदत अद्याप मिळालेली नाही. नुसता पंचनाम्यांचा खेळ सुरू आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत पत्र लिहिले आहे. आता सरकारने शेतकऱ्यांचा अंत बघू नये, असे पटोले म्हणाले.

Mahayuti Government : जिल्हा पुरवठा कार्यालयात २३.५७ लाखांची अफरातफर!

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यासंदर्भात प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्र्यांना कोण भेटायला गेलं, याचे आम्हाला सोयरसुतक नाही. आमच्यासाठी लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत. कोण कुणाला भेटलं, याला आम्ही महत्व देत नाही आणि ते दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याला कुणी विरोध करण्याचं कारण नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले.