ST Employees ; एस.टी. कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी पगार?

Transport Ministers move, possibility of relief : परिवहन मंत्र्यांची हालचाल, दिलासा मिळण्याची शक्यता

Mumbai : राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. कर्मचाऱ्यांना यंदा गणेशोत्सवाच्या आधीच पगार मिळण्याची शक्यता आहे. दर महिन्याला उशिराने पगार मिळवणाऱ्या लाखो एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरू शकते.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जसा सणासुदीपूर्वी वेतन देण्याचा निर्णय झाला आहे, तसाच लाभ एस.टी. कर्मचाऱ्यांनाही मिळावा, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे.

सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत, पगाराची फाईल तातडीने वित्त विभागाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी पगार द्यावा असा आदेश दिल्याने, एस.टी. कर्मचाऱ्यांनाही तोच लाभ मिळावा, अशी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Pawars warning : पक्षाच्या नावावर दुकानदारी केली तर त्याचा बंदोबस्त करणार,

प्राप्त माहितीनुसार, जर वित्त विभागाकडून निधी सोमवारपर्यंत मंजूर झाला, तर एस.टी. कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार सोमवारी 25 ऑगस्ट किंवा मंगळवारी 26 ऑगस्टला जमा होऊ शकतो. गेल्या अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदाच वेळेवर आणि विशेष म्हणजे सणाच्या आधी पगार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांना नियमित पगारासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. अनेकदा महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्यात पगार मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली होती. सणासुदीच्या काळात खर्चाचे ओझे अधिक असल्याने वेळेत पगार मिळावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून सतत होत होती.

BALASAHEB THORAT : थोरांतांच्या धमकीचा निषेध करण्यासाठी हजारो एकवटले

आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ही मागणी मान्य होण्याची चिन्हे आहेत. गणेशोत्सवाच्या आधीच पगार मिळाल्यास एस.टी. कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.