Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार, म्हणाले..

Chief Minister’s counterattack on Congress leader Rahul Gandhi : आता काँग्रेसने उत्तर दिले पाहिजे

Mumbai : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करून मतचोरी झाल्याचा आरोप केला होता. यासाठी त्यांनी सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरले होते. त्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपवर टिकेची झोड उठवली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अतुल बाबा भोसले यांनी जे सत्य समोर आणले आहे. त्यातून खरे मत चोर कोण आहे, हे स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांचेच लोक मतचोरी करत असल्याची बाब समोर आली आहे. मत चोरीचा ठेका राहुल गांधी यांनीच घेतला आहे. त्यांचेच लोक मत चोरी करत असतील, तर आता राहुल गांधी यांनीच त्याचे उत्तर दिले पाहिजे.

Farmer loan waiver : शेतकरी कर्जमाफीबाबत अजित पवारांचे महत्त्वाचे विधान!

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निकटत्या नातेवाईकांनी दोन – दोन तर कुठे तीन – तीन ठिकाणी मतदार नोंदणी केली असल्याची बाब उजेडात आली आहे. यासाठी चव्हाण यांच्या नातेवाईकांनी वेगवेगळ्या पत्त्यांचा वापर केल्याचेही सांगण्यात आले आहे. असे प्रकार करून त्यांनी बोगस मतदान केले आहेत. ‘उलटा चोर कोतवाल को डाटे..’, या म्हणीप्रमाणे काँग्रेसचे नेतेच मत चोरी झाल्याचे ओरडत फिरत आहेत.

Women Commission : महायुती सरकार देवासारखं, महिला आयोग परिषदेत वक्तव्य

बुथ कॅप्चरींग कुणाच्या सरकारच्या काळात होत होते, याचेही उत्तर आता काँग्रेस नेत्यांनी दिले पाहिजे, असेही भाजप नेत्यांनी म्हटले आहे. आधी काँग्रेसने स्वतःच्या कारवाया बघाव्या अन् नंतर मत चोरीचे आरोप करावे. उगाच पराभवाची सल म्हणून उठसूठ आरोप करू नये, असेही भाजपने स्पष्ट केले आहे.