Are there signs of disagreement in the Shinde – Fadnavis alliance : शिंदे – फडणवीस युतीत मतभेदाचे सूर?
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑल इज वेल’ असल्याचा दावा केला जात असला तरी वस्तुस्थिती वेगळी असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागावर थेट नाराजी व्यक्त केल्याने दोन्ही नेत्यांमध्ये मतभेदाचे सूर तीव्र झाले आहेत.
केंद्र सरकारच्या योजनांच्या पुनरावलोकन बैठकीत फडणवीसांनी नगरविकास विभागाच्या सुमार कामगिरीवर ताशेरे ओढले. “अटल मिशन रिज्युव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन योजनेची अंमलबजावणी नीट झाली नाही. नगरविकास विभागाकडून कामचुकारपणा झाला आहे,” असे परखड मत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केले. बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी कामात सुधारणा करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. विशेष म्हणजे या बैठकीत एकनाथ शिंदे स्वतः अनुपस्थित होते.
Eknath Shinde : आमदाराच्या आईला हार्ट अटॅक; एकनाथ शिंदेंची तत्परता ठरली जीवनदायी,
अमृत 2.0 ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून २०२१ ते २०२६ दरम्यान शहरी भागातील पाणीपुरवठा, स्वच्छता, ग्रीन पार्क आणि शहरीकरणाशी संबंधित विकासासाठी मोठा निधी राज्याला दिला आहे. “केंद्र सरकारने निधी दिला, पण त्याचा योग्य विनियोग झाला का? कंत्राटदारांकडून वेळेत कामं करून घेतली का?” असा थेट सवाल फडणवीसांनी अधिकाऱ्यांना केला. यावरून त्यांनी नगरविकास विभागाला स्पष्टपणे कानपिचक्या दिल्याचे समजते.
Reservoirs overflow : जलाशये ओव्हरफ्लो, अतिउत्साही पर्यटकांवर प्रशासनाची करडी नजर !
एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये महाविकास आघाडीतून फोडाफोडी करून भाजपाशी हातमिळवणी केली. त्यानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी नगरविकास विभाग आपल्या कडेच ठेवला होता. सत्तांतरानंतर फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि शिंदेंना उपमुख्यमंत्री पदासोबत नगरविकास खाते पुन्हा देण्यात आले. मात्र आता याच विभागाच्या कामगिरीवर फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात “शिंदे-फडणवीस युतीत ऑल इज नॉट वेल” अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
राज्याच्या राजकारणात आधीच बोगस लाभार्थी घोटाळा, महिला योजना, केंद्र-राज्य संबंध यासारखे प्रश्न गाजत आहेत. त्यातच मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिंदेंच्या विभागावर केलेली उघड नाराजी युतीतील नात्याला नवी दिशा देणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
____








