Sent an air ambulance and ran to the airport himself : एअर अॅम्ब्युलन्स पाठवली आणि विमानतळावर स्वतः धावले!
Mumbai : राज्यातील राजकारणात कठोर निर्णयक्षम नेता म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपली संवेदनशीलता दाखवून दिली आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या आई वत्सलाबाई यांना शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवणे आवश्यक होते. मात्र रस्तेमार्गे त्यांना नेणं धोक्याचं ठरलं असतं. अशा गंभीर परिस्थितीत आमदार बांगर यांनी थेट एकनाथ शिंदे यांना फोन केला आणि त्यानंतर घटनाक्रम वेगाने बदलला.
शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्वरित नांदेडला एअर अॅम्ब्युलन्स पाठवली. या एअर अॅम्ब्युलन्समधून आमदार बांगर आपल्या आईला घेऊन मुंबईला आले. इतकंच नव्हे तर मुंबई विमानतळावर स्वतः एकनाथ शिंदे उपस्थित राहून वत्सलाबाईंची भेट घेतली. त्यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि त्वरित लीलावती रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.
Reservoirs overflow : जलाशये ओव्हरफ्लो, अतिउत्साही पर्यटकांवर प्रशासनाची करडी नजर !
या वेळी आमदार संतोष बांगर अत्यंत भावुक झाले. “एकनाथ शिंदे यांनी माझ्या आईसाठी एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली नसती, तर आज त्यांच्या प्राणाला धोका निर्माण झाला असता. त्यांनी वेळेत दाखवलेली तत्परता माझ्या आईसाठी जीवनदायी ठरली. मी त्यांचा मनापासून आभारी आहे,” अशी कृतज्ञ प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, शिंदे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली. “प्रत्येक शिवसैनिक माझ्यासाठी कुटुंबासारखा आहे. संकटाच्या प्रसंगी त्यांच्यासाठी धावून जाणं ही माझी जबाबदारी आहे. कर्तव्य भावनेतून केलेली ही मदत आहे,” असे शिंदे म्हणाले.
सत्तेच्या रंगात वावरणाऱ्या राजकारणातही “मानवता आणि कर्तव्यभावना” या दोन्हींचा समतोल साधणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांनी आपली छाप उमटवली अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटत आहे.
____








