Supreme Court hears case of mockery of disabled people : सर्वोच्च न्यायालयाने दिव्यांगांची खिल्ली उडवल्या प्रकरणी सुनावले
New Delhi : सर्वोच्च न्यायालयाने दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी इन्फ्लुएन्सर्स, युट्यूबर्स आणि कॉमेडियन्सना चांगलंच फटकारलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा संवेदनशील गटांचा अपमान करणं सहन केलं जाणार नाही, असं स्पष्ट करत कोर्टाने सर्व संबंधितांना सार्वजनिकरित्या विनशर्त माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावरील कंटेंट हे फ्री स्पीच म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकत नाही, तर ते व्यावसायिक भाषण आहे आणि त्यावर कायदेशीर निर्बंध लागू शकतात, असंही न्यायालयाने ठणकावलं आहे.
‘इंडियाज गॉट लेटंट’ या शोदरम्यान समय रैना, रणवीर अलाहाबादिया उर्फ बिअरबायसेप्स, विपुल गोयल, बलराज परमरजित सिंग घई, निशांत जगदीश तंवर आणि सोनाली ठक्कर ऊर्फ सोनाली आदित्य देसाई यांनी दिव्यांगांबाबत आक्षेपार्ह व असंवेदनशील टिप्पणी केली होती. समय रैनाने एसएमए स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी ग्रस्त मुलांवर अपमानास्पद विधान केले होते, तर रणवीर अलाहाबादियाने पालकांबद्दल अश्लील टिप्पणी केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यामुळे समय रैनाचा शो बंद करावा लागला आणि सोशल मीडियावर या सर्व कलाकारांवर चौफेर टीका झाली.
Pandit Vs Hake : लक्ष्मण हाके हा अदखलपात्र रिचार्जवाला श्वान !
या प्रकरणात एसएमएग्रस्त मुलांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने कडक भूमिका घेतली. या कुटुंबीयांनी दाखल केलेली याचिका हे एक धाडसी पाऊल असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्याचबरोबर सर्व संबंधितांना त्यांच्या युट्यूब चॅनल आणि पॉडकास्टवर विनशर्त माफी मागण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांना एक प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार असून, त्यात भविष्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या हक्कांबाबत जागरूकता पसरवण्यासाठी प्रयत्न करतील, असे नमूद करावे लागणार आहे.
Maratha Andolan : आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा तू कुठे होतीस?
न्यायालयाने स्पष्ट इशारा दिला आहे की, भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास या इन्फ्लुएन्सर्स आणि कॉमेडियन्सना थेट दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. समाजातील संवेदनशील गटांचा अपमान करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चौकटीत बसत नाही, यावर सुप्रीम कोर्टाने ठाम भूमिका घेतली आहे.
____








