Nagpur’s Ganesh festival : गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी ‘एआय’, मंडळांना सीसीटीव्ही बंधनकारक !

‘AI’ for security, CCTV mandatory for Ganesh mandals : नऊ हजार पोलिस आणि होमगार्ड तैनात

Nagpur : आज गणपती बाप्पा विराजमान होतो आहे. घरोघरी आणि सार्वजनिक गणशोत्सव मंडळांमध्ये गेल्या काही दिवसांपासून यासाठी धामधुम सुरू आहे. पोलिसांनीदेखील जोरदार तयारी केलेली आहे. यावेळी गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी AI टेक्नॉलॉजीचा वापर पोलिसांकडून करण्यात येणार आहे. लोकांच्या सोशल मिडिया वापरावरही पोलिसांची करडी नजर असणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पेंडॉलच्या शेजारी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे, असे पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी सांगितले.

पोलिस आयुक्तांनी तब्बल नऊ हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. नागपूर शहराच्या चौकाचौकात तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. यासाठी होम गार्डही तैनात करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात असामाजित तत्वांनी अफवा पसरवून नये. यासाठी सोशल मिडियावर पोलिसांच्या सायबर सेलची करडी नजर असणार आहे. या पवित्र काळात कुणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन आयुक्तांकडून करण्यात आले आहे.

Maratha movement : आझाद मैदानावर पूर्वपरवानगीशिवाय आंदोलनास मनाई !

महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेला गणेशोत्सव आजपासून सुरू होतोय. त्यामुळे सर्वत्र उत्सवी आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. नागपुरातील चितार ओळीत एकाहून एक अशा सुंदर घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्ती विकल्या जात आहेत. घरोघरी आणि मंडळांची सजावटीची कामे पूर्ण झाली आहेत. शहरातील महाल, इतवारी आणि इतर सर्व लहानमोठ्या बाजारपेठा भक्तांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. यावेळी ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Maratha movement : मनोज जरांगेंचा मुंबई मोर्चा !

सार्वजनिक गणेश मंडळांकडून अतिशय कल्पक देखावे उभारले गेले आहेत. उद्यापासून गणेशमुर्तीचे दर्शन घेम्यासोबत देखावे पाहण्यासाठी बाप्पाच्या भक्तांची गर्दी उसळणार आहे. काही मंडळांनी प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत, तर काही मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे उभारले आहेत. गणेशोत्सवात शांतता पाळण्याचे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.