Headquarter of the Organic Farming Mission in Akola will be shifted to Pune : राजकारण पेटले, विदर्भाच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप
Akola आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी सुरू केलेले डाॅ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे मुख्यालय अकोल्यातून पुण्याला हलविण्याचा निर्णय घेतल्याने विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली आहे. यापूर्वी पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोल्यातून हलविण्यात आले होते. आता पुन्हा एक महत्त्वाचे कार्यालय बाहेर गेल्याने विदर्भाच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून सुरू झाला आहे.
२०१८ मध्ये आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी विशेष उपक्रम म्हणून अकोल्यात मिशनचे पहिले राज्य मुख्यालय सुरू करण्यात आले होते. या अंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठा तयार करण्यासाठी अनुदान, प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळत होते. गट स्थापन, उत्पादक कंपन्या, समूह संकलन केंद्रे, सामूहिक सुविधा केंद्रे अशा माध्यमातून विषमुक्त अन्नधान्याचा पुरवठा शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचत होता. तथापि, आता मुख्यालय पुण्याला हलविण्यात आल्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Local Body Elections : नागपुरात ओबीसी, अकोल्यात महिला आरक्षण, अधिसूचना निघाली
अकोल्यात कृषी विद्यापीठ व राज्य बियाणे महामंडळ असल्याने जैविक शेती संशोधनासाठी हे ठिकाण नैसर्गिक केंद्र आहे. इतकेच नव्हे, तर देशातील पहिला सेंद्रिय शेती अभ्यासक्रमही येथे सुरू झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर मुख्यालय हलविण्याचा निर्णय योग्य आहे का, असा सवाल शेतकरी संघटनांनी उपस्थित केला आहे.
Local Body Elections : निवडणूक आचारसंहितेची धाकधूक, पालकमंत्र्यांची लगीनघाई!
मुख्यालय हलविण्याच्या निर्णयाला विरोधकांनी निवडणूकपूर्व राजकीय मुद्दा बनविण्याचे संकेत दिले आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांच्या भावनांवर परिणाम करणारा हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.








