Local Body Elections : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दावेदारांचा शोध!

Search underway for contenders for the Zilla Parishad President post : अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण; राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात

Akola जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने, जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांना योग्य उमेदवार उभा करणे ही मोठी कसरत ठरणार आहे. त्यामुळे उमेदवार निवडून आणण्यासाठी राजकीय पक्षांकडून लवकरच मोर्चेबांधणी सुरू होणार असून, स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये चर्चांना वेग आला आहे.

Dr. Panjabrao Deshmukh Organic Farming Mission : अकोल्यातील जैविक शेती मिशनचे मुख्यालय पुण्यात हलविणार!

सात पंचायत समित्यांचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबरोबरच सात पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये —

अनुसूचित जाती : १
अनुसूचित जाती महिला : १
अनुसूचित जमाती महिला : १
नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) : १
नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) महिला : १
सर्वसाधारण प्रवर्ग : १
नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) महिला : १

असे एकूण सात सभापतीपदांचे आरक्षण निश्चित झाले आहे. पंचायत समितीनिहाय कोणत्या प्रवर्गाला कोणते सभापतीपद मिळेल, हे सोडतीद्वारे ठरणार आहे.

Bacchu Kadu : ‘इतर केंद्रे सुरू करा, नाहीतर आम्हीच वाटप करू’

जिल्हा परिषद अध्यक्षपद व पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर, आता जिल्हा परिषदेच्या ५२ गटांसह सातही पंचायत समित्यांच्या १०४ गणांचे आरक्षण निश्चित होणार आहे. त्यानंतर गट व गणनिहाय आरक्षण ठरेल. त्यामुळे राजकीय समीकरणे आखण्यासाठी व उमेदवार निवडण्यासाठी सर्वच पक्षांनी आपले लक्ष गट व गणांच्या आरक्षणावर केंद्रित केले आहे.