Rane Vs Thackeray : ऑपरेशन सिंदूरवेळी हे लंडनच्या बारमध्ये बसले होते, दाखवू का?

 

Nitesh Rane hits back at Thackeray over India-Pak match : भारत-पाक सामन्यावरून नितेश राणेंचा ठाकरेंवर पलटवार

Mumbai : वरळी कोळीवाड्यात आयोजित आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंनी शनिवारी आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात हजेरी लावली. यावेळी त्यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल करताच भारत-पाकिस्तान सामन्यावरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले.

राणे म्हणाले, “अडीच वर्षे आमदारांचे वडील मुख्यमंत्री होते, ते स्वतः मंत्री होते, तरी कोळीवाड्याची अवस्था बदलवू शकले नाहीत. ६ हजारांनी निवडून येणं म्हणजे बालेकिल्ला नव्हे. सध्या ते राजकीय व्हेंटिलेटरवर आहेत. आम्ही २०२९ मध्ये दाखवू,” असा टोला लगावत त्यांनी आदित्य ठाकरेंवर हल्ला चढवला.

भारत-पाक सामन्यावरून उद्धव ठाकरेंवर पलटवार करताना राणे म्हणाले, “विजयी मिरवणुकीत पाकिस्तानचे नारे का, हिरवा गुलाल का? तेव्हा पाकचा राग आला नाही का? सर तन से जुदा नारे देणाऱ्यांचे राजीनामे का घेतले नाहीस? महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्ष टिकले असते तर पुढचा मुख्यमंत्री मुस्लिम झाला असता.”

India Pak Match : देशापेक्षा व्यापार मोठा, क्रिकेटवर कमवायचाय पैसा !

राणेंनी अस्लम शेख यांच्यावरही टीका केली. “अस्लम शेखने मिनी पाकिस्तान बनवून ठेवले आहे. सरकारी भाचा आमदार झाला तो सचिन वाझेसोबत बुकी होता. ऑपरेशन सिंदूरवेळी हा लंडनमध्ये बसलेला होता, तेव्हा कोणत्या बारमध्ये होता हे दाखवू का? तेव्हा हिंदुत्व का आठवलं नाही?” असा सवाल त्यांनी केला.

यावेळी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवत राणे म्हणाले, “तो बुरख्यात लपून उद्या मॅच बघेल आणि पाकिस्तान जिंदाबाद नारे लावेल. संजय राऊत मरीन ड्राईव्हवर ब्लॅक करताना सापडेल. उद्धव ठाकरेंकडे महापौर गेल्यास पुढचा महापौर अब्दुल किंवा शेख होईल. हिंदू समाजाचे कुंकू पुसले जात असताना लंडनवरून का आलात नाही?”

Maratha reservation : मराठा समाज कोणत्या प्रवर्गात? संचेतींचा दावा मराठे मागास नाहीत

पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. “पंतप्रधानांनी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. उद्धव ठाकरेंना स्वतःच्या वडिलांचे नाव घेण्याचीही लायकी नाही. बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना बाहेर हाकलले असते. अस्लम शेखला उपमुख्यमंत्री करण्याचा शब्द त्यांनी दिला होता. काँग्रेसला सांगून ते सर्व ठरवलं होतं,” असा दावा राणेंनी केला.

Mahajan left MNS : मला वापरून घेतलं, मी अमितजींचा अपराधी

युबीटीच्या खासदारांवरही त्यांनी निशाणा साधला. “पतपेढीच्या वेळी इतके ॲक्टिव्ह नव्हते जितके आता आहेत. आमची तब्येत खराब झाली आहे, चांगला डॉक्टर असेल तर दाखवा,” असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

एकंदरीत, नितेश राणेंनी आदित्य आणि उद्धव ठाकरेंवरून सुरू केलेला हल्लाबोल भारत-पाक सामन्याच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र झाला असून, आगामी राजकीय घडामोडींना रंगत आणणारा ठरला आहे.

____