Vidarbha Farmers : ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचा आक्रोश

Farmers demand declaration of a wet drought : आडगाव राजा–सुलजगाव ग्रामसभेची मागणी, सरकारला निवेदन

Dusarbid सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सिंदखेडराजा तालुक्यातील ऐतिहासिक आडगाव राजा गावासह सुलजगाव परिसरातील शेतकऱ्यांचा आक्रोश अखेर ग्रामसभेच्या ठरावाच्या रूपाने शासनापर्यंत पोहोचला आहे. ग्रामस्थांनी एकमुखी ठराव मंजूर करून “आडगाव राजा व परिसराला ओला दुष्काळग्रस्त घोषित करावे” अशी मागणी केली असून, त्याबाबतचे निवेदन तहसीलदार सिंदखेडराजा यांना देण्यात आले.

ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच सौ. रंजना संतोष चव्हाण यांनी भूषवले. विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी जगन्नाथ नागरे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आलेल्या शासन परिपत्रकाचे वाचन केले. मात्र, या ठिकाणी गावकऱ्यांनी शासन योजना ऐवजी शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती मांडत सरकारसमोर हाक दिली.

Solar Agricultural Feeder Project : सौर कृषी वाहिनी प्रकल्प स्थलांतरित खरा, गावकऱ्यांची मागणी

ग्रामस्थांनी सांगितले की, “पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत आडगाव राजा व सुलजगाव परिसराला ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत मिळाली पाहिजे.”

ग्रामसभेत हा ठराव मंजूर झाल्यानंतर तो तहसीलदार सिंदखेडराजा यांना प्रत्यक्ष सादर करण्यात आला. ग्रामसभेला ग्रामपंचायत अधिकारी जगन्नाथ नागरे, तलाठी बी. बी. गिरी, मुख्याध्यापक गायके सर, शिक्षक विनोद ठाकरे, पोलिस पाटील निलेश शिनगारे, यांच्यासह गावातील मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदन सादर करताना रुस्तुमराव झोरे, ज्ञानेश्वर खंडारे, संतोष किंगरे (सरपंच सुलजगाव), रामदास कहाळे, गजानन राजे जाधव, श्याम काळे, माधव विणकर, रमेशराव शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Uddhav Balasaheb Thackarey : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे विटंबन, ठाकरे गटाचे आंदोलन

ग्रामसभेच्या या ठरावामुळे सरकारसमोर पुन्हा एकदा ओल्या दुष्काळाच्या जाहीरनाम्याचा प्रश्न उभा राहिला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली नाही, तर आगामी निवडणुकांमध्ये याचे राजकीय परिणाम दिसून येऊ शकतात, असा इशारा स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला आहे