व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र RTO Checkpost : अदानीचा ‘सद्भाव’ संपला, चेकपोस्टवरून बिनधास्त सुरू आहे ओव्हलोड वाहतूक...

RTO Checkpost : अदानीचा ‘सद्भाव’ संपला, चेकपोस्टवरून बिनधास्त सुरू आहे ओव्हलोड वाहतूक !

Adani’s ‘Sadbhav’ Ends, Overloaded Trucks Speed Past Checkposts : ट्रकचा आकार बघून लावला जातोय वजनाचा अंदाज

Nagpur : महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या सीमांवर आरटीओचे चेकपोस्ट आहेत. येथे परराज्यांतून येणाऱ्या ट्रक्सची तपासणी करून त्यावर शुल्क, दंड आकारला जातो. येथे वजन काटेही आहेत. ज्यावर वाहनांचे वजन करून ओव्हरलोड वाहनांकडून दंड वसूल केला जातो. हे सर्व काम अदाणी समुहाच्या ‘सद्भाव’ या कंपनीकडून केले जाते. पण मागील काही दिवसांत सद्भावचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम चेकपोस्टवरील कामावर झाला आहे.

राज्याच्या सिमांवर परिवहन विभागाचे (RTO) २२ चेकपोस्ट आहेत. मागील आठवड्यात सद्बाव कंपनीचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे चेकपोस्टवरील वजन काटे बंद पडले. त्यामुळे या चेकपोस्टवरून ओव्हरलोड वाहने सर्रास पास केली गेली. तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात या राज्यांच्या सीमांवरून महाराष्ट्रात हजारो वाहने दाखल होतात. सर्व्हर डाऊन असल्यामुळे ओव्हरलोड वाहनेही बिना वजन करता सर्रास पास करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.

Vijay Wadettiwar : बाहेर जी भूमिका मांडता, तीच बैठकीत मांडा ना..!

राज्यातील २२ पैकी काही चेकपोस्टवर वाहनांकडून वसुली केली जात आहे. पण सर्व्हर डाऊन असल्याचा फायदा घेत येथील कर्मचारी ही वसुली रेकॉर्डवर दाखवत नाहीत, तर परस्पर हडप करून टाकतात. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल गेल्या आठवड्यात बुडाला आहे. अजूनही काही चेकपोस्टवरील वजन काटे सुरू झालेले नाहीत. त्यामुळे तेथे हा गैरप्रकार अद्यापही सुरू असल्याची माहिती सूत्र देतात.

NCP Sharad Pawar : जयंत पाटलांवरील टिकेचे पडसाद, नागपुरात राष्ट्रवादी आक्रमक !

वजन काटे बंद असले तरी ओव्हरलोड वाहनांची तपासणी करून दंड आकारला जात आहे. ई चालान व इतरही कामे सुरळीत सुरू असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. वजन काटे नसले तरी ट्रकचा आकार आणि इतर गोष्टी पाहून ओव्हरलोडचा दंड आकारला जात असल्याचेही काही अधिकाऱ्यांनी सांगितले. पण प्रत्यक्षात ओव्हरलोड वाहने वसुली करून सर्रास सोडली जात असल्याची सुत्रांची माहिती आहे.

error: Content is protected !!