₹5,000 crore for the development of the agriculture sector : कृषी समृद्धी योजनेचा आधार, अतिवृष्टीधारकांना तत्काळ भरपाई देणार
Akola कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञान व पाण्याचा सुयोग्य वापर याद्वारे शेती क्षेत्राच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व कृषी समृद्धी योजनेत शासनाने मोठी तरतूद केली आहे. नैसर्गिक संकटात शेतकरी बांधवांना पाठबळ देण्यासाठी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. राज्यातील एकही अतिवृष्टीबाधित शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरात आयोजित शिवार फेरी व चर्चा सत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
Vijay Wadettiwar : बाहेर जी भूमिका मांडता, तीच बैठकीत मांडा ना..!
भरणे म्हणाले की, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत सुमारे ६ हजार कोटी, कृषी समृद्धी योजनेसाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवे तंत्रज्ञान, साधने शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध योजना, उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यंदा राज्यात अतिवृष्टीचे संकट उद्भवून आतापर्यंत ६३ लक्ष ५१ हजार ५२० हे. इतके नुकसान झाले. राज्य शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी आहे. भरपाईपासून कुणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
NCP Sharad Pawar : जयंत पाटलांवरील टिकेचे पडसाद, नागपुरात राष्ट्रवादी आक्रमक !
एकात्मिक शेतीकडे वळण्याची गरज
ते पुढे म्हणाले की, बदलते पर्यावरण, वेळोवेळी येणारी नैसर्गिक संकटे शेती क्षेत्रासमोर आहेत. या काळात शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी एकात्मिक शेती पद्धती, पूरक व्यवसायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा व पिकाला चांगला बाजारभाव मिळावा, नैसर्गिक संकटातही किफायतशीर शेतीपद्धती निर्माण व्हावी यादृष्टीने संशोधन व प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कृषी विद्यापीठाने नवनवीन वाणांचे संशोधन पुढे आणले आहे. त्याची माहिती व लाभ शिवार फेरीत शेतकऱ्यांना होईल. त्याचप्रमाणे, शेतक-यांना येणा-या अडचणी, त्यांच्या शंकांचे निरसनही चर्चासत्राच्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.








