Reservation controversy : जातिवरचे चष्मे नको, राजासारखं मन ठेवून निर्णय घ्या

Pankaja Mundes big statement on the reservation struggle: : आरक्षण संघर्षावर पंकजा मुंडेचं मोठं वक्तव्य

Mumbai: राज्यात सध्या मराठा, ओबीसी आणि बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण केले. त्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करत शासन निर्णय काढला. मात्र या जीआरवर मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच बंजारा समाजाकडूनही आरक्षणासाठी आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट भाष्य केले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, “ओबीसी-मराठा संघर्ष आहे, पण जसा तो मांडला जातो तसा मला तो दिसत नाही. कारण मी तसे चष्मे लावून फिरत नाही. मी एखाद्याकडे बघताना जातीचा रंग पाहत नाही. अनेक समाज वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षण मागतात आणि तिथला समाज विरोध करतो, हे नैसर्गिक आहे. जसे मागणे नैसर्गिक तसेच विरोधही नैसर्गिक. यातून मार्ग काढणे हे नेत्याचे कर्तव्य आहे. राज्यकर्त्यांनी राजासारखं मन ठेवून सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे. सामाजिक दृष्ट्या मागास लोकांना कुठेही धक्का न लागता तो निर्णय व्हायला हवा.”

Manoj Jaiswal : बॉम्बार्डीयव विमान धुळखात, अन् मनोज जायस्वाल सीबीआयच्या ताब्यात !

दरम्यान, बीड जिल्ह्यात दाखल झालेल्या रेल्वेबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या की, “ गोपीनाथ मुंडे साहेब नेहमी म्हणायचे की बीडमध्ये रेल्वे नाही म्हणून जिल्हा विकासापासून मागे राहतो. खासदार झाल्यावर हा पहिला विषय त्यांनी मांडला. यात सर्वांचे योगदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते. आता पुढे बीड-परळी रेल्वे मार्गासाठी प्रयत्न राहतील.”

Local body election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ३-३ कोटीचा खर्च !

बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीवर बोलताना त्या म्हणाल्या की, “आज प्रशासनाकडून आढावा घेतला जाईल आणि उद्या कॅबिनेट बैठकीत याबाबत माहिती दिली जाईल. सरकारची मानसिकता शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची आहे.”

____