व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Ramraksha recitation: रामरक्षा पठणावरून नागपुरात हायव्होल्टेज ड्रामा; संदीप जोशींनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’...

Ramraksha recitation: रामरक्षा पठणावरून नागपुरात हायव्होल्टेज ड्रामा; संदीप जोशींनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ केला व्हायरल

Sandip joshi shared Uddhav Thackeray’s video on social media, goes viral: भाजप-ठाकरे गटातील संघर्ष शिगेला; आज रामरक्षा पठण

Nagpur अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या आरोपांवरून देशभरातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना, आज नागपुरात ‘रामरक्षा’ पठण कार्यक्रमावरून भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत थेट संघर्ष पेटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरच्या रामनगर भागातील राम मंदिरात आज शनिवारी उद्धव सेनेच्या वतीने रामरक्षा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच नागपूरचे माजी महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी यांनी एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत राजकीय टायमिंग साधले आहे. या व्हिडिओमुळे नागपुरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात हा उपक्रम राबवला जात असल्याने भाजप आणि उद्धव सेना एकमेकांवर तुटून पडल्याचे चित्र आहे.

उद्धव सेनेकडून नागपुरातील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली जात असतानाच, भाजपचे नेते संदीप जोशी यांनी त्यांना तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले आहे. जोशी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे भाषण करताना दिसत असून, “जे जय श्रीराम म्हणतात, त्याला मी हरामखोरपणा म्हणतो,” असे वादग्रस्त विधान करताना ते ऐकू येत आहेत. नेमक्या आंदोलनाच्या आणि रामरक्षा पठणाच्या दिवशीच संदीप जोशी यांनी हा व्हिडिओ समोर आणून राजकीय टायमिंग साधल्याने उद्धव सेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजप कडून केला जात आहे. सध्या नागपूरच्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर याच व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू असून, आता उद्धव ठाकरे या ‘व्हिडिओ वॉर’ला कसे प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Msrtc F : एसटी प्रवास महागला! तिकीट दरात १३.५६ टक्क्यांची वाढ

दुसरीकडे, मुंबईनंतर आता थेट नागपूरला लक्ष्य करत उद्धव सेनेने या रामरक्षा पठणाचे जय्यत नियोजन केले आहे. सच्चे रामभक्त या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन करत शिवसेनेने त्यांना लेखी पत्र पाठवले आहे. एवढेच नव्हे तर, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि महापौरांनाही निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासाठी स्वतः उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाले असून, दुपारी ४ वाजता राममंदिरात हे पठण होणार आहे. सुमारे आठ ते दहा हजार शिवसैनिक या उपक्रमात सहभागी होणार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे.

error: Content is protected !!