70% of farmers made repayments : खरीप हंगामात पेरणीचे आव्हान, नवीन पीककर्जासाठी वाढली धावपळ
Akola राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असतानाच १५ सप्टेंबरपर्यंत तब्बल ७० टक्के शेतकऱ्यांनी जुने कर्ज फेडून नवीन पीककर्जाचा लाभ घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र, सत्तेवर आल्यानंतर दहा महिने उलटूनही कर्जमाफीची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे शेतकरी निराश आहेत. खरीप हंगामात पेरणीसाठी आवश्यक असलेले भांडवल मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना जुन्या कर्जाची परतफेड करून नवीन कर्ज घ्यावे लागल्याचे चित्र दिसत आहे.
Local Body Elections : माजी नगरसेवक, इच्छुकांचे राजकीय गणित बिघडणार
यंदाच्या खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा होती. मात्र, प्रतीक्षा करूनही दिलासा मिळाला नाही. जुन्या कर्जाची परतफेड केल्याशिवाय नवीन पीककर्ज उपलब्ध होत नसल्याने अखेरीस शेतकऱ्यांना कर्जफेड करूनच नवीन कर्ज घ्यावे लागले.
Orders to officers : सर्व अधिकार्यांना फिल्डवर राहण्याचे आदेश !
अमरावती विभागातील कर्जफेडीचे प्रमाण
जिल्हा परतफेडीचे प्रमाण (%)
अकोला ७४
अमरावती ८१
बुलढाणा ४९
वाशिम ६१
यवतमाळ ७१








