Local Body Elections : चुकीने काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले तर… बावनकुळेंना भीती !

BJP’s Chandrashekhar Bawankule Warns A Congress Mayor Would Be a Blunder : भाजपला दिलेले मत किती महत्वाचे, याचा प्रत्यय येईल

Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२५ मध्ये होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. सर्वच राजकीय पक्षांची तयारी जोमाने सुरू झाली आहे. भाजपकडून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंबर कसली आहे. नुकताच त्यांनी नागपूर जिल्ह्यातील बीडगाव येथे कार्यकर्ता संवाद मेळावा घेतला. यामध्ये चुकीने काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले तर काय, याबद्दल त्यांनी भीती व्यक्त केली.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना बावनकुळे म्हणाले, आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येने आपले नगराध्यक्ष निवडून आले पाहिजे. विकास निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे. आपले नगराध्यक्ष निवडून आले तर विकास कामे योग्य पद्धतीने होतील, मात्र चुकीने काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले, तर मात्र निधीचा आणि विकास कामांचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्यावर मतचोरीचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला. पण निवडणूक हरल्यावर आरोप करण्याची काँग्रेसच्या नेत्यांची परंपरा आहे.

Asaduddin Owaisi : खा. असदुद्दीन ओवेसी कोल्हापूर दौऱ्यावर, वातावरण तापले !

आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. हिंमत असेल तर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी निवडणूक लढवावी, असे आव्हान बावनकुळेंनी दिले. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेली मते मी कर्ज म्हणून स्वीकारली आहेत. त्यामुळे पाच वर्षे विकास कामांच्या माध्यमांतून हे कर्ज फेडण्याचे काम करणार आहे. भाजपला दिलेली मते किती महत्वाची आहे, याचा प्रत्यय लोकांना येतो आहे. जे वचन आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिले होते, ते पूर्ण करणार आहोत. पंतप्रधान आवास योजनेतून बेघरांना घरे दिली जाणार आहेत, शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज आणि कर्जमाफीचा शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Harshawardhan Sapkal : रावणासारखीच संघाची दहा तोंडे !

मेळाव्याला माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, जिल्हा महामंत्री अनिल निधान, राहुल किरपान, तालुका मंडळ अध्यक्ष सचिन घोडमारे, जिल्हा युवामोर्चा अध्यक्ष चेतन खडसे, रमेश चिकटे, उमेश रडके, निकेश कातुरे, संतोष तिजारे, गोपाल गिरमेकर, प्रांजल वाघ, नेहा राऊत, आरती चिकटे आदी उपस्थित होते.