Prajakata Mali : ..अन् म्हणूनच सुधीरभाऊंना विकासपुरूष म्हटले जाते !

This Is Why Sudhir Mungantiwar Is Known as a Development Leader : पहिल्यांदा मुलमध्ये आलेय, लई भारी वाटतंय !

Chandrapur : सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कामांमुळे मी प्रेरीत झाले आहे. मुल शहरात येत असताना चौपदरी सिमेंटचे रस्ते बघितले. प्रवासादरम्यान मला माहिती मिळाली की, या शहरात सगळ्याच गोष्टी आहेत. सुंदर, सुसज्ज नाट्यगृह, क्रीडा संकुल, जलतरण तलाव, सिंचन सुविधा आदी सर्वच आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व पायाभूत सुविधा सुंदर पद्धतीने केल्या आहेत, असे म्हणत महाराष्ट्रातील तमाम रसिकांच्या हृदयांवर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फ्रेम सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आमदार मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव केला.

चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मुल शहरात ‘भाऊंचा गरबा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या असता प्राजक्ता माळी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, राज्याचे माजी अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विकास पुरूष का म्हटले जाते, याची प्रचिती चंद्रपूर जिल्ह्यात आल्यावर आपसुकच येते. मला वाटतं त्यांच्या कामाची पद्धतच वेगळी आहे. २४ बाय ७ आणि ३६५ ही दिवस त्यांचं काम सुरू असतं. कदाचित झोपेतही ते विकासकामांचाच विचार करत असतील. खुपच नियोजनबद्ध आणि दूरदृष्टी ठेऊन ते काम करतात.

Sudhir Mungantiwar : आ.सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे चिमुकल्या वैष्णवीला मिळाले नवे जीवन

देवीची सर्वात मोठी पूजा..
आमदार मुनगंटीवार यांनी केवळ चंद्रपूर जिल्ह्यासाठीत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी भरपूर काम केले आहे. संपूर्ण देशाला हेवा वाटावा, असं बॉटनिकल गार्डन येथे आहे. वनखात्यासाठी, ताडोबासाठी त्यांनी केलेलं काम सगळ्यांना माहिती आहे. टाटा कॅन्सर हॉस्पीटल, मेडिकल कॉलेज, आर्थिक, आरोग्य, सांस्कृतिक, वने सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव कार्य केले आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. आपण आज नवरात्रोत्सव साजरा करतो आहे. हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभं करणं, ही सर्वात मोठी देवीची पूजा आहे, असे प्राजक्ता माळी म्हणाल्या. रोजगार निर्मिती झाली कुटुंब व्यवस्थित चालते,आणि हे काम आमदार मुनगंटीवार यांनी प्रभावीपणे केले आहे. त्यांनी केलेली विकास कामे सांगायची झाली तर दोन तासही कमी पडतील, असेही त्या म्हणाल्या.

Sudhir Mungantiwar : कृषी पंप हा चंद्रपूरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्क !

 

पहिली भेट..
आमदार मुनगंटीवार यांच्यासोबत माझी पहिली भेट नागपुरात झाली होती. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि माॅं जिजाऊंवर भाषण दिले होते. ते भाषण ऐकून मी थक्क झाले होते. कारण इतिहासाचा इतका दांडगा अभ्यास असलेला नेता मी पहिल्यांदा पाहिला होता. त्यांनी फक्त भाषणच दिले नाही, तर ते प्रत्यक्ष करून दाखवलं. छत्रपतींची वाघनखं त्यांना लंडनहून मातृभूमीत आणून दाखवली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि देशप्रेम ओतप्रोत भरून असलेलं एकत्रित रसायन म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार, असे त्या म्हणाल्या.

Sudhir Mungantiwar : पोंभूर्णा होणार राज्यातील आदर्श तालुका !

वंदे मातरम्..
आज माझ्या कुटुंबात आणि मित्रपरिवारांत अशी लोक आहेत की, जे फोन उचलल्यावर ‘वंदे मातरम्..’ म्हणतात. आमदार मुनगंटीवार यांनी सुरू केलेली ही चळवळ अभूतपूर्व आहे. ज्या ग्राहम बेलने टेलिफोनचा शोध लावला, त्याच्य गर्लफ्रेन्डचं नाव हॅलो होतं, त्यामुळे त्याने ती चाल लावली. त्यामुळे आपण आताही हॅलो म्हणतो. आपण कशाला त्याच्या गर्लफ्रेन्डचं नाव घ्यायच? आज वंदे मातरम् आपण बोलतो, ही जगावेगळी गोष्ट आहे, असे प्राजक्ता माळी यांनी सांगितले. ते सांस्कृतिक कार्य मंत्री असताना त्यांनी कलावंतांसाठी भरीव कार्य केले आहे.

Sudhir Mungantiwar : खड्डे बुजवा, नाहीतर गाठ माझ्याशी !

राज्याचे आणि देशाचे नेतृत्व करावे..
आमदार मुनगंटीवार या जिल्ह्याचे नेतृत्व करतात आणि मी येथे राहात नाही, याचे दुःख आहे. तुम्ही लोक भाग्यवान आहात. मला तुमचा हेवा वाटतो. पण सुधीरभाऊंमध्ये ती क्षमता आहे की भविष्यात ते राज्याचे नेतृत्व करू शकतात, त्यांनी ते करावे आणि ते निश्चितपणे करतील, असा विश्वास प्राजक्ता माळी यांनी व्यक्त केला.