व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांनी आमचा सत्यानाश केला!

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांनी आमचा सत्यानाश केला!

Congress leader Vadettiwars anger; New controversy in state : काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा संताप; राज्यात नवा वाद

Mumbai: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला गेल्या महिन्यात मोठे यश मिळाल्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात शासन निर्णय जारी केला. मात्र या निर्णयानंतर राज्यात पुन्हा वादळ उठले असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटलांवर थेट आरोप करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत मराठा समाजाच्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतली होती. आंदोलक थेट मुंबईत दाखल झाल्याने राज्य सरकारवर दबाव वाढला. त्यात हायकोर्टाने सरकारला फटकारल्याने प्रशासन अडचणीत आले. या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जरांगे पाटलांशी चर्चा करून जीआर काढला. यात हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, औंध गॅझेट आणि कोल्हापूर गॅझेट या ऐतिहासिक दस्तऐवजांच्या अंमलबजावणीसंदर्भात निर्णय घेण्यात आला.

Local Body elections : झीरो रोस्टर’चा धक्का, बदलाची आस धरलेल्यांच्या मनसुब्यांवर फिरणार पाणी

मात्र, या शासन निर्णयाला ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला. मंत्री छगन भुजबळ, प्रा. लक्ष्मण हाके आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या जीआरला “ओबीसींच्या हक्कांवर घाव” ठरवले. वडेट्टीवार यांनी तर थेट मनोज जरांगे पाटलांवरच आरोप करत म्हटले की “जरांगे पाटलांनी आमचा सत्यानाश केला आहे. त्यांनी आम्हाला उद्धवस्त केलं आहे.

धुळे येथील आकडेवारीनुसार 38 हजार दाखले देण्यात आले होते, पण आता कुणबी दाखल्यांची संख्या 1 लाख 28 हजारांवर गेली आहे. हे काय चाललं आहे? त्यांनी आम्हाला मातीत घालून संपवायचं ठरवलं आहे. आम्ही छोटे समाज आहोत, पण आम्हाला संपवून एकछत्री राज्य करायचं ठरवलं आहे.”

Local Body Elections : भाजपचे सर्व आक्षेप मान्य; बुलढाणा नगरपरिषद प्रभागरचनेत बदल!

वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, 2 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने काढलेला जीआर ओबीसी समाजाच्या मुळावर घाव घालणारा आहे आणि तो रद्द करणे अत्यावश्यक आहे.
ओबीसी नेत्यांची एक बैठक बोलावली असून, राज्यातील 40 हून अधिक ओबीसी नेते या बैठकीत सहभागी होत आहेत. या बैठकीत 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याचा मुद्दा केंद्रस्थानी राहणार आहे.

Rahul Bondre : चिखलीत काँग्रेसकडून संविधान पूजन आणि मनुस्मृती दहन

वडेट्टीवार यांनी स्पष्ट इशारा दिला की “जर सरकारने हा जीआर रद्द केला, तर आम्ही 10 ऑक्टोबर रोजीचा ओबीसी मोर्चा मागे घेऊ आणि मुख्यमंत्र्यांचे स्वागत करू. पण जर जीआर कायम ठेवला, तर ओबीसींचा संघर्ष अधिक तीव्र होईल.”

दरम्यान, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, तर दुसरीकडे ओबीसी नेते या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. आगामी काही दिवसांत या प्रश्नावर राज्यातील राजकारण अधिक गतीमान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

_____

error: Content is protected !!