Possibility of big help for flood-affected farmers : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठ्या मदतीची शक्यता
Shirdi : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या शिर्डी दौऱ्याने राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काल रात्री शाह शिर्डीत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांच्यासोबत त्यांनी बंद दाराआड बैठक घेतली. साधारण पाऊण तास चाललेल्या या बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीवर आणि शेतकऱ्यांना तातडीच्या आर्थिक मदतीवर सविस्तर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होत असून, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि नुकसानभरपाईची मागणी वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठ्या आर्थिक पॅकेजवर चर्चा झाली असून, केंद्र आणि राज्य सरकार मिळून तातडीची मदत जाहीर करण्याच्या तयारीत आहेत.
Electricity tariff hike : दिवाळीच्या तोंडावर वीजदरवाढीचा ‘शॉक’!
बैठकीत राज्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला, तसेच प्रशासकीय निर्णय प्रक्रियेला गती देण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यां सोबत झालेली ही मध्यरात्रीची गुप्त बैठक साधारण एक तास चालली. त्यानंतर सर्व नेते माध्यमांपासून दूर राहिले, ज्यामुळे बैठकीतील चर्चेचा नेमका मुद्दा काय होता, यावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान, अमित शाह यांच्या शिर्डी दौऱ्यात साईबाबांचे दर्शन, नंतर लोणी आणि कोपरगाव येथील विविध कार्यक्रमांना उपस्थिती राहणार आहे. लोणी प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्ण उंचीच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल. याच ठिकाणी सहकारी साखर कारखान्याच्या नुतनीकरणाचा कार्यक्रम पार पडेल.
Gogawale on kadam : कोणाच्या मनात काय आहे ते कोणी सांगू शकत नाही !
शिर्डीतील या मध्यरात्रीच्या बैठकीने केवळ प्रशासकीय हालचालींनाच वेग दिला नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र-राज्य नेतृत्वामधील समन्वय मजबूत करण्याचा हा संकेत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.








