Farmers suicide : “नव नगराची अधिसूचना काढा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या!”

Demand for Immediate Notification of the New City Project : संतप्त शेतकऱ्यांचा सरकारला इशारा; सिंदखेडराजा परिसरात संतापाची लाट

Sindkhedraja मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या नवनगर प्रकल्पाच्या अनिश्चिततेमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाले आहेत. या उद्विग्नतेचा शोकांत परिणाम म्हणजेच नवनगर बाधित शेतकरी कुटुंबातील बाळू उर्फ मच्छिंद्र एकनाथ कुहिरे (वय ३८) या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

या घटनेने परिसरातील शेतकरी वर्ग संतप्त झाला असून, त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सरकारकडे “नव नगराची अधिसूचना तात्काळ काढा, अन्यथा आम्हाला सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या” अशी तीव्र मागणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या निवेदनात नमूद केले आहे की, “नव नगर प्रकल्पाची घोषणा होऊनही कामाचा एकही टप्पा सुरू झाला नाही. जमीन अधिग्रहण, पुनर्वसन आणि आर्थिक भरपाईबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून, बाळू कुहिरे यांच्यासारख्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.”

Congress Meeting : वंचितला सोबत घ्या, पण महायुतीतील कोणताही पक्ष चालणार नाही

शेतकऱ्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा देत म्हटले आहे की, “जर शासनाने तातडीने अधिसूचना काढून निधी मंजूर केला नाही, तर आम्हाला सामूहिक आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही.”

सिंदखेडराजा तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी संघटनांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत शासनाकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

निवेदनावर राजेंद्र अंभोरे, लक्ष्मीकांत कठोरे, जगन चव्हाण, अरविंद खरात, देविदास भालेराव, संदीप मेहेत्रे, प्रवीण पवार, रोहिदास राठोड, गोपाळ चिंचोळकर, राम उदावंत, विष्णू मुंडलिक आणि शरद म्हस्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Party meeting : जातीवर टोकाची भूमिका पक्षाची प्रतिमा बिघडवते !

स्थानिक स्तरावर आता नव नगर प्रश्नाचे राजकीय स्वरूप स्पष्ट होत असून, आगामी काळात या मुद्यावरून सरकारला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो, अशी चर्चा ग्रामीण भागात रंगली आहे.