Local Body Elections : चार पंचायत समित्यांमध्ये ‘महिला’ राज

‘Women’ Rule in Four Panchayat Samitis : अकोलासह चार सभापती पदे महिलांसाठी राखीव

Akola जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या आगामी अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी गुरुवारी सभापती पदांच्या आरक्षणासाठी सोडत प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन भवनात पार पडलेल्या या प्रक्रियेत चार पंचायत समित्यांवरील सभापती पदे महिलांसाठी राखीव ठरली आहेत.

या सोडतीनुसार अकोला, तेल्हारा, पातूर आणि बार्शीटाकळी या तालुक्यांमध्ये महिलांचे नेतृत्व दिसणार आहे. विशेष म्हणजे, यापैकी दोन पदे अनुसूचित जाती-जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात महिलांच्या नेतृत्वाला चालना मिळणार असून, स्थानिक पातळीवर राजकीय सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Draft Voter List Published : प्रारूप मतदार यादी जाहीर; आक्षेप नोंदविण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत

 

शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, महिला बचतगट अशा विविध क्षेत्रांत सक्रिय असलेल्या महिलांना आता पंचायत समितीच्या निर्णयप्रक्रियेत थेट सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ग्रामीण भागातील महिलांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरून नेतृत्व सिद्ध करण्याचा निर्धार केल्याने राजकीय समीकरणातही बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत.

OBC Reservation : ‘ओबीसी आरक्षणाला धक्का नको, जातीय जनगणना करा!’

तज्ज्ञांच्या मते, या आरक्षणामुळे महिला सक्षमीकरणाला बळ मिळणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांचा सहभाग वाढण्यास हातभार लागेल. चार तालुक्यांमध्ये महिलांचे नेतृत्व उदयास येणे हे ग्रामीण भागातील सामाजिक परिवर्तनाचे सकारात्मक लक्षण मानले जात आहे.

अकोला जिल्हा : पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण

बाळापूर – अनुसूचित जाती
अकोला – अनुसूचित जाती महिला
तेल्हारा – अनुसूचित जमाती महिला
अकोट – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
पातूर – सर्वसाधारण महिला
बार्शीटाकळी – नागरिकांचा मागासवर्ग महिला
मूर्तिजापूर – सर्वसाधारण