व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Heavy Rains Cause Crop Damage : तुटपुंजी मदत शेतकऱ्याने सरकारला केली परत...

Heavy Rains Cause Crop Damage : तुटपुंजी मदत शेतकऱ्याने सरकारला केली परत !

Angered by Meager Aid, Farmer Returns Government Compensation : अतिवृष्टीने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झाले होते मोठे नुकसान

Yavatmal : यावर्षी ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांत पावसाने हाहाकार माजवला. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यातच हे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची घोषणा सरकारने केली. मात्र प्रत्यक्ष ती मदत दिलीच नाही. त्यामुळे शेतकरी पुरता खचून गेला. आता सरकारने जुन्या जीआरनुसार मदत दिली. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील चिडलेल्या एका शेतकऱ्याने सरकारला मदतीची रक्कम परत केली.

यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील सुकळी या गावातील अल्पभूधारक शेतकरी रमाकांत कोल्हे यांनी सरकारने मदत म्हणून दिलेली रक्कम धनादेशाद्वारे सरकारला परत पाठवली आहे. हा धनादेश त्यांनी तहसीलदारांना सुपूर्द केला. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाच्या भरपाईचे सहा हजार ९०० रुपये कोल्हे यांच्या खात्यात जमा झाले होते. ‘अशी तुटपुंजी मदत मला नको आहे’, असे म्हणत कोल्हे यांनी तहसीलदारांमार्फत ही रक्कम शासनाला परत केली आहे.

Radhakrushna Vikhe Patil : ‘आरक्षणावरून दुही पसरविण्याचे पाप शरद पवारांचे!’

सरकारने मदतीची घोषणा करून तीन दिवस झाले. पण या घोषणेनुसार मदत मिळालीच नाही, तर जुन्या अध्यादेशानुसार ही मदत मिळाली आहे. नवीन अध्यादेश आल्यानंतर मदतीची रक्कम दिली जाणार आहे, असे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी सांगितले. सरकारने हेक्टरी १८ हजार ५०० रुपयांची मदत जाहीर केली. पण काल जेव्हा प्रत्यक्ष खात्यात पैसै जमा झाले, तेव्हा हेक्टरी चार हजार ५०० रुपयांप्रमाणे पैसे जमा होत असल्याचे लक्षात आले. एकीकडे साडेअठरा हजार रुपये सांगायचे आणि प्रत्यक्षात साडेचार हजार रुपये द्यायचे, हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकारण आहे, असे शेतकरी रमाकांत कोल्हे यांनी सांगितले. सरकारच्या या अशा प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!