Sanjay Gaikwad : निवडणूक आयाेगाचा मनमानी कारभार, कुणाचेही नियंत्रण नाही

Shivsena MLA Levels Serious Allegations Against the Commission : शिंदे गटाच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर, बुलढाण्यात चार हजार बाेगस मतदार असल्याचा दावा

Buldhana मतदार यादीतील घाेळावर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेले असतानाच बुलढाणा मतदार संघाचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही निवडणुक आयाेगावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार सुरू असल्याचा आराेप करीत एकट्या बुलढाण्यात चार हजार बाेगस मतदारांची नावे असल्याचा दावा केला आहे.

प्रारूप यादीपर्यंत एखादा तरूण १८ वर्षांचा हाेत असेल आणि तुम्ही १ जुलै राेजीच मतदार यादीत नावे टाकणे बंद करत असाल तर तुम्ही हजारो नवमतदारांना मतदानापासून वंचित ठेवत आहात. जुलै ते ऑक्टाेबर या दरम्यान १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना नाव नाेंदवण्याची सुविधाच नाही. दुसरीकडे बुलढाण्यात चार हजारांपेक्षा जास्त नावे बाेगस आहेत. ही नावे पुन्हा पुन्हा आली आहेत. हे मतदार जिल्हा परिषद, पंचायत समितीला ग्रामीण भागात मतदान करतात आणि नगर पालिकेला शहरात मतदान करतात असा दावाही आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.

Vidarbh Farmers : तहसील कार्यालयासमोर काँग्रेसने थापल्या चुलीवर भाकरी

रिपीट झालेली नावे आयाेग का काढत नाही, असा सवाल करून त्यांनी बुलढाण्यात ३० वर्षांपूर्वी सरकारी नाेकरीत असलेल्या अधिकाऱ्यांची नावे मतदार यादीत आहेत. एवढेच नव्हे तर २० वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या मतदारांची नावेही यादीत आहेत. यांच्या नावावर कुणीही येवून बाेगस मतदान करीत असल्याचा खळबळजनक दावाही गायकवाड यांनी केला.

Shivaji Education Society : कृषिमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पापळ येथे कृषी महाविद्यालय सुरू होणार

निवडणुक आयाेग नावे टाकण्याची आणि कमी करण्याची सक्ती का करते. मतदार कार्ड आधार कार्डशी जाेडा, मृत्यूचे दाखले आल्यानंतर नावे कमी करावे. पण हे निवडणूक आयाेग का करीत नाही. १ जुलै ते ऑक्टाेबर महिन्यात नविन मतदारांना संधी दिली असती तर अनेक नवमतदारांना मतदानाची संधी मिळाली असती. मात्र, निवडणुक आयाेगाने कुठलीही पूर्वसूचना न देता थेट मतदार यादीत नावे नाेंदवणे बंद केले. त्यामुळे, हजाराे मतदार मतदानापासून वंचित राहणार आहेत. बाेगस मतदार काढा, अशी मागणी सर्वच पक्ष करीत आहेत, मी एकटाच नाही असेही गायकवाड यांनी सांगितले.