Voter list allegations : सदोष मतदारयादीचा आरोप फेटाळला !

The Election Commission gave a detailed answer : निवडणूक आयोगाने दिले सविस्तर उत्तर

Mumbai : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदारयाद्या सदोष असल्याचा महाविकास आघाडी आणि मनसेने केलेला आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे विरोधकांच्या सर्व आक्षेपांवर तपशीलवार स्पष्टीकरण दिले असून, मतदारयाद्या अचूक राहाव्यात यासाठी राजकीय पक्षांनी मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधी नेमण्याचे आवाहन केले आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी या आक्षेपांची दखल घेत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला होता. त्यानंतर आयोगाने स्पष्ट केले की, सद्यस्थितीत वापरल्या जाणाऱ्या मतदार याद्या १ जुलैपर्यंत अद्यावत असलेल्या विधानसभा मतदारसंघांच्या याद्यांवर आधारित आहेत. या याद्या प्रभागनिहाय विभागून प्रसिद्ध करण्यात आल्या असून, त्रुटी आढळल्यास त्या नोंदणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Local Body Elections : निवडणुकांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा लागणार कस!

विरोधकांनी नाशिक मध्य मतदारसंघातील एका घरात तब्बल ८०० मतदार नोंदवले असल्याचा गंभीर आक्षेप घेतला होता. याबाबत आयोगाने स्पष्टीकरण देताना सांगितले की, संबंधित परिसर सुमारे दीड हजार चौरस मीटरचा असून, त्या ठिकाणी सुमारे ७०० निवासी व अनिवासी बांधकामे आहेत. या बांधकामांना क्रमांक नसल्याने मतदारांच्या पत्त्यांमध्ये समान घराचा उल्लेख झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अमरावती जिल्ह्यातील वडनेरा मतदारसंघातील ४५० मतदारांचे घर क्रमांक ‘शून्य’ दाखविल्याचा आक्षेपही विरोधकांनी घेतला होता. आयोगाने सांगितले की, हे सर्व मतदार झोपडपट्टी अथवा पाल टाकून राहतात. त्यांना महानगरपालिकेकडून घर क्रमांक देण्यात आलेला नसल्याने त्यांच्या अर्जांमध्ये क्रमांक नमूद नव्हता, त्यामुळेच ‘शून्य’ क्रमांक दाखविण्यात आला आहे.

Vidarbha Farmers : शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवा, किसान ब्रिगेडचा इशारा

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली असता राजुरा मतदारसंघातील मतदारसंख्या अचानक वाढल्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीदेखील या विषयावर निवडणुकीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, निवडणूक आयोगाने या आक्षेपांवर कोणतेही मतप्रदर्शन केले नाही.

Prakash Tayde : कोणी पक्ष सोडून गेला म्हणून काँग्रेस संपत नाही

आयोगाने स्पष्ट केले की, मतदारयादीतील त्रुटी दूर करण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून, राजकीय पक्षांनीदेखील मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधी नेमून सक्रिय सहभाग घ्यावा. आयोगाने सर्व राजकीय पक्षांना सूचित केले आहे की, जर एखाद्या प्रभागातील मतदार यादीत नावे, वय, पत्ता किंवा पुनरावृत्तीशी संबंधित त्रुटी आढळल्यास, त्या त्रुटी संबंधित विधानसभा नोंदणी अधिकाऱ्यांकडे तत्काळ नोंदवाव्यात.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता निर्णायक टप्प्यात जात असताना, मतदारयादीवरील हा वाद आयोगाने थेट फेटाळल्याने निवडणूक प्रक्रिया अधिक वेगाने आणि पारदर्शकतेने पुढे जाण्याची शक्यता आहे.

_____