Sudhir Mungantiwar : आ. मुनगंटीवार यांनी नातीसोबत ‘किलबिल’ येथील निराधार चिमुकल्यांसह साजरी केली दिवाळी

A Lifelong Message Delivered Through the Spirit of Social Service : समाजसेवेच्या अनुभवासह दिला जीवनभर स्मरणात राहील असा संदेश

Chandrapur : राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार हे अतिशय संवेदनशीन नेते आहेत. आपल्या मतदारसंघातीलच नव्हे तर राज्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच जागरूक असतात. प्रसंगी आक्रमकही होतात, पण तेवढ्याच हळव्या मनाचे नेते म्हणून ते ओळखले जातात. अगदी सणासुदीलासुद्धा सामाजिक बांधिलकी जपण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. या दिवाळीतही आमदार मुनगंटीवार यांनी तो जपला, कुटुंबीयांसोबत सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देत त्यांनी चंद्रपूरच्या किलबिल प्राथमिक बालगृह आणि दत्तक योजना केंद्रात कुटुंबीय आणि विशेष म्हणजे नातीसह दिवाळी साजरी केली.

दिवाळीनिमित्त आमदार मुनगंटीवार कुटुंबीयांनी ‘किलबिल’मधील चिमुकल्यांशी संवाद साधत त्यांच्या आवडीनिवडी विचारल्या आणि उत्साहाने त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला. चिमुकल्यांच्या हसण्याच्या आवाजाने आणि आनंदी चेहऱ्यांनी परिसर दुमदुमला. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी आणि प्रेम देणे आवश्यक आहे. लहानग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणे, हीच खरी सेवा आहे, अशी प्रतिक्रीया यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी माध्यमांना दिली.

Sudhir Mungantiwar : उमरी पोतदार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण

काल (२० ऑक्टोबर) दिवाळीच्या संध्येला आमदार मुनगंटीवार कुटुंबीयांसह ‘किलबील’ संस्थेमध्ये पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत धर्मपत्नी सपनाताई मुनगंटीवार, मुलगी शलाकाताई बिडवई आणि नात शुरवी होत्या. यावेळी आमदार मुनगंटीवार यांच्यापेक्षा त्यांच्या कुटुंबीयांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. नात शुरवी किलबिलमधील मुलांमधील एक होऊन गेली. हे बघून आजी-आजोबांना कौतुक झाले नाही, तर नवलच.. सामाजिक बांधिलकीचा वारसा तिसऱ्या पिढीतही झिरपतोय, हे बघून आमदार मुनगंटीवार आणि सपनाताई मुनगंटीवार यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

Sudhir Mungantiwar : छत्रपतींच्या स्फूर्ती केंद्रात नतमस्तक झाले नरेंद्र मोदी, मुनगंटीवारांच्या पुढाकारात झाली होती स्थापना !

दिवाळी हा सण म्हणजे अंधारावर प्रकाशाने मात करण्याचा उत्सव आहे. हा सण फक्त आनंद वाटण्यापुरताच मर्यादित नाही, तर तो लहान मुलांमध्ये सकारात्मक विचार आणि भावनिक आधार निर्माण करण्याचाही सण आहे. मुनगंटीवार कुटुंबीयांनी ‘किलबिल’मधील चिमुकल्यांना मिठाई वाटून आणि फटाके फोडून त्यांना दिवाळीची अनोखी भेट दिली. यामुळे ही दिवाळी किलबिलकरांसाठी एक आगळीवेगळी दिवाळी ठरली.

दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि घराघरांत हसू फुलवणारा उत्सव, पण काही मुलांसाठी हे सणाचे पर्व म्हणजे फक्त दिवास्वप्न ठरतं. अशा छोट्या मुलांसाठी आमदार मुनगंटीवार यांनी दातृत्वाचे हात पुढे केले. अनाथाश्रमातील मुलांसोबत त्यांनी कुटुंबीयांसह दिवाळीचा आनंद वाटला. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या हसण्यातून प्रत्यक्षात समाजाला सेवेचा अर्थ दाखवला.

Sudhir Mungantiwar : १०३ प्रकल्पग्रस्तांना तात्काळ नोकऱ्या द्या, मुनगंटीवारांचे स्पष्ट निर्देश !

मुनगंटीवार कुटुंबीय किलबिलमध्ये चिमुकल्यांसाठी मिठाई, खेळणी, रंगीत दिवे आणि आगामी काळातील थंडी बघता रुम हिटर घेऊन पोहोचले. आमदार मुनगंटीवार यांनी मुलांच्या छोट्या प्रश्नांना लक्षपूर्वक उत्तरे दिली. प्रत्येकाचे जीवन महत्वाचे आहे. प्रत्येक मुलाला जगण्याची संधी मिळायला हवी. या अनाथ चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हिच खरी दिवाळी आहे, असे मुनगंटीवार यावेळी भावुकपणे म्हणाले. आमदार मुनगंटीवार सहकुटुंब आल्यामुळे मुलांचा उत्साह दुप्पटीने वाढला. मुनगंटीवार कुटुंबीयांनी साजऱ्या केलेल्या या आगळ्यावेगळ्या दिवाळीमुळे समाजसेवा म्हणजे फक्त दानधर्म नव्हे, तर ती जीवनाला अर्थ देणारी कृती आहे, हे अधोरेखीत झाले. ‘किलबिल’साठी हा अनुभव आयुष्यभर स्मरणात राहिल, असाच होता. या आश्रमाच्या भविष्यात ज्या काही गरजा असतील, त्या पूर्ण करण्याची ग्वाही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. यावेळी आ. मुनगंटीवार यांची नात कुमारी शुरवीनी अनाथ मुलांसोबत रंगबिरंगी फुलझडी फिरवत दिवाळी साजरी केली.