Countdown begins for the Zilla Parishad election battle : महाविकास आघाडी व महायुतीची केंद्रनिहाय याद्यांवर नजर, इच्छुक उमेदवारांचे गॉडफादर लॉबिंगला वेग
Buldhana जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा पहिला महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. ३ नोव्हेंबर रोजी आक्षेपांचे निराकरण करून ग्रामीण भागातील अंतिम मतदारयादी जाहीर झाली असून, येत्या १२ नोव्हेंबर रोजी केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. या याद्यांकडे आता महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांसह स्थानिक इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील ६१ जिल्हा परिषद गट आणि १२२ पंचायत समिती गणांमध्ये राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी गॉडफादरांकडे उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केले असून, अनेक ठिकाणी अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. ग्रामीण पातळीवरील राजकारणाला रंग चढल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत आहे.
Local Body Elections : शिवसेनेची तयारी जोरात, मेहकरमध्ये ‘शिवसंकल्प’!
काही दिवसांपूर्वीच मतदारयादीतील त्रुटींवरून महाविकास आघाडीने राज्यभर आंदोलन व महामोर्चा काढला होता. त्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील स्थानिक नेते व कार्यकर्तेही मतदारयादीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. वरिष्ठ नेत्यांकडून स्थानिक पातळीवर गडबडी टाळण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, प्रशासनाकडून छाननी प्रक्रिया अधिक काटेकोर करण्यात आली आहे.
मतदारयादीवर राजकीय वॉच, प्रशासनही अलर्ट!
मतदारयाद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी दोन्ही गटांनी स्थानिक स्तरावर वॉच टिम तयार केल्या आहेत. अंतिम याद्यांवर नेत्यांची नजर असल्याने प्रशासनही पूर्ण अलर्ट मोडमध्ये आहे. मतदारयादीतील कोणत्याही त्रुटी टाळण्यासाठी संपूर्ण चमू काटेकोर छाननी करत असल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात सुमारे १९८८ मतदान केंद्रे असण्याची शक्यता आहे. केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरच जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
Local Body Elections : नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीसाठी थोपटले दंड!
सुमारे १६ लाख मतदारांसाठी जाहीर झालेल्या या अंतिम याद्यांमुळे आता निवडणुकीच्या औपचारिक घोषणेची उलटी गणती सुरू झाली आहे. पक्षीय कार्यकर्त्यांच्या हालचाली आणि गावागावांत राजकीय तापमान झपाट्याने वाढले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी ३ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या अंतिम आरक्षणाची अधिसूचना जारी केली. या आरक्षणाचा तपशील तहसील कार्यालये, पंचायत समित्या आणि जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी प्राप्त हरकतींची सुनावणी करून आरक्षणास अंतिम मान्यता दिली आहे.
Crime news : भोंदू बाबाने IT इंजिनिअर सह शिक्षक पत्नीला 14 कोटींनी लुटलं!
या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, येत्या काही दिवसांत उमेदवारीसाठी सुरू होणारी चढाओढ आणि गटबाजीच्या घडामोडी अधिक रंगतदार होणार आहेत.








