Local Body Elections : भाजपकडून अकोल्यात निवडणूक जबाबदाऱ्यांची घोषणा

BJP announces election responsibilities in Akola : डॉ. अमित कावरे ग्रामीण प्रमुख, विजय अग्रवाल महानगर प्रमुख

Akola अकोला जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाकडून महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी अकोला ग्रामीण प्रमुखपदी डॉ. अमित कावरे तर अकोला महानगर प्रमुखपदी विजय अग्रवाल यांची नियुक्ती केली आहे. तसेच ग्रामीण आणि शहर प्रभारी म्हणून आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

विजय अग्रवाल यांच्या दूरदृष्टीचा आणि संघटन कौशल्याचा लाभ पक्षाला व्हावा म्हणून त्यांच्यावर अकोला महानगरपालिकेची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सातत्याने विजय मिळविणारे डॉ. अमित कावरे यांच्याकडे ग्रामीण भागाची धुरा सोपविण्यात आली आहे.

Bacchu Kadu : मतदानाचा पुरावा मिळालाच पाहिजे, नाहीतर काय उपयोग?

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने वेगवेगळ्या स्तरांवर नेतृत्व ठरविले आहे. या निवडीचे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला मोठे यश मिळेल, असा विश्वास भाजप जिल्हा उपाध्यक्ष माधव मानकर यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra politics : ‘उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे’ मजकुरामुळे राजकारण तापले !

पालकमंत्री ऍड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जयंत मसने, संतोष शिवरकर, वैशाली शेळके, जयश्री पुंडकर, पवन महाले, योगेश गोतमारे, किशोर पाटील, तेजराव थोरात आदींच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाणार आहे. नेत्यांच्या आत्मविश्वासाचा प्रत्यक्षात किती फायदा होतो, हे वेळच सांगणार आहे.