Patur Municipal Council election pending : अकोला जिल्ह्यातील पातूर नगर पालिकेची निवडणूक प्रलंबित, हद्दवाढीवरील न्यायप्रविष्ठ प्रकरणामुळे आयोगाचा निर्णय
Akola राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अखेर मुहूर्त ठरला आहे. नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला असून, राज्यातील २४७ पैकी २४६ नगर पालिकांची निवडणूक होणार आहे. मात्र, अकोला जिल्ह्यातील पातूर नगर पालिकेची निवडणूक प्रलंबित ठेवण्यात आली आहे.
पातूर नगर पालिकेच्या हद्दवाढीबाबत उच्च न्यायालयात दाखल न्यायप्रविष्ठ प्रकरण असल्याने या नगर पालिकेची निवडणूक प्रक्रिया रेंगाळली होती. निवडणूक आयोगाने या परिस्थितीचा विचार करून पातूर नगर पालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
Local Body Elections : भाजपकडून अकोल्यात निवडणूक जबाबदाऱ्यांची घोषणा
दरम्यान, जिल्ह्यातील इतर नगर पालिका व नगर पंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर नगर पालिका तसेच हिवरखेड व बार्शीटाकळी नगर पंचायत येथे नियोजित वेळापत्रकानुसार निवडणूक पार पडणार आहे.
पातुर नगर परिषदेच्या हद्द वाढी संदर्भात स्थानिक नेत्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. हा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने नगरपालिकेची निवडणूक प्रलंबित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात एकमेव पातुर नगरपरिषदेवर अद्यापही प्रशासक राज कायम राहणार आहे. गेल्या चार वर्षापासून येथे प्रशासक आहे.
Bacchu Kadu : मतदानाचा पुरावा मिळालाच पाहिजे, नाहीतर काय उपयोग?
न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत आणखी किती वर्ष प्रशासक राहणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान पातुर नगर परिषदेची रखडलेली आरक्षण चळवळ सोमवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे निवडणूक होईल अशी अपेक्षा होती, परंतु आयोगाने न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक प्रलंबित ठेवली आहे.








