Vanchit Bahujan Aghadi : ती पोलीस भरती रद्द करा, वंचित आघाडीची मागणी

Resentment over exclusion of reserved posts for Scheduled Castes and Scheduled Tribes : अनुसूचित जाती-जमातींची राखीव पदे वगळल्यावरून असंतोष

Akola राज्यात २०२५ मध्ये पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई अशा विविध पदांसाठी एकूण १५,६३१ जागांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र या भरतीत अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव जागांचा भंग झाल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे.

महासचिव राजेंद्र पातोडे यांनी गृहमंत्री, राज्यपाल आणि पोलिस महासंचालक यांना निवेदन देऊन ही भरती तातडीने रद्द करून आरक्षणासह नव्याने प्रक्रिया राबवावी, अशी मागणी केली आहे.

Local Body Elections : राज्यातील एकमेव नगरपरिषद, जिथे होणार नाही निवडणूक!

पातोडे यांनी म्हटलं आहे की, सध्या सुरू असलेली ही भरती २०२२-२३ आणि २०२४-२५ या कालावधीतील रिक्त पदे भरण्याच्या नावाखाली केली जात आहे. मात्र अकोला, सोलापूर शहर, कोल्हापूर, सांगली, नागपूर लोहमार्ग, अहिल्यानगर आणि गोंदिया या सात जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जातींसाठी एकही पद राखीव नाही.

तसेच नवी मुंबई, कोल्हापूर, सोलापूर शहर, अहिल्यानगर आणि गोंदिया या पाच जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमातींसाठी देखील पदसंख्या शून्य असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक जिल्ह्यांमध्ये भटके विमुक्त, ओबीसी आणि विशेष मागास प्रवर्गांसाठीही जागा उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राज्यातील पोलिस भरतीत आरक्षण अधिनियम लागू असून, तो डावलून सरकारकडून ही प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Local Body Elections : भाजपकडून अकोल्यात निवडणूक जबाबदाऱ्यांची घोषणा

वंचित बहुजन युवा आघाडीने या भरतीचा तीव्र निषेध नोंदवत, आरक्षित जागांसह नव्याने भरती प्रक्रिया सुरू न झाल्यास न्यायालयीन लढा देण्याचा इशारा दिला आहे.