व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Munde-Jarange controversy : ‘त्याला डुकरासारखा उचलून नेतो’ वक्तव्यावरून पुन्हा उफाळला नवा वाद...

Munde-Jarange controversy : ‘त्याला डुकरासारखा उचलून नेतो’ वक्तव्यावरून पुन्हा उफाळला नवा वाद !

Video of Dhananjay Munde’s colleague Dada Garad goes viral : धनंजय मुंडेंचे सहकारी दादा गरड यांचा व्हिडिओ व्हायरल

Mumbai : मराठा आरक्षणाचा विषय महाराष्ट्रात आधीच तापलेला आहे. त्यातच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरंगे यांनी राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत आणि आता धनंजय मुंडे यांचे सहकारी असलेले दादा गरड यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेली आहे.

‘त्याला डुकरासारखा उचलून नेतो’ असे धनंजय मुंडे गंगाधर काळकुटे यांच्याबद्दल बोलले असल्याचं दादा गरड या व्हायरल व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहेत. गंगाधर काळकुटे हे मनोज जरांगे यांचे निकटम सहकारी असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे हा विषय आता केवळ राजकीय वाद न राहता मराठा आंदोलनाच्या संवेदनशील पार्श्वभूमीवर मोठं वादळ निर्माण करू शकतो, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी लगेचच सरकारवर आणि विशेषतः धनंजय मुंडे यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी विचारले आहे की, जर हा व्हिडिओ खरा असेल तर मुंडेंवर आता काय कारवाई सरकार करणार आहे? दुसरीकडे भाजप नेत्यांनी या वादावर सावध भूमिका घेतल्याचे पहावयास मिळते आहे.

Dhananjay Munde : मला राजकीय आणि सामाजिक जीवनातून संपवण्याचा षडयंत्र, मुंडेंचा प्रतिहल्ला !

मुंडे यांच्या समर्थकांकडून या व्हिडिओलासुद्धा राजकीय षडयंत्र म्हणण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध काही दिवसांपासून नियोजनबद्ध पद्धतीने बदनामी मोहीम राबवली जात आहे आणि हा व्हिडिओही त्याचाच एक भाग असल्याचे मुंडे समर्थकांकडून सांगण्यात येते आहे. दरम्यान गंगाधर काळकुटे यांच्या बाबतीत धनंजय मुंडे खरंच असं काही बोलले का, हे तपासण्याची गरज आहे.

Local body election : व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या !

या नव्या व्हिडिओमुळे धनंजय मुंडे यांची प्रतिमा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मनोज जरागे यांच्याशी सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ आंदोलनाला अधिक उग्ररूप देऊ शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. सद्यस्थितीत प्रशासन आणि सत्ताधारी या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. राजकारण, आंदोलन आणि वैयक्तिक आरोप यांचा त्रिवेणी संगम झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

error: Content is protected !!