Munde-Jarange controversy : धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे दोघेही मित्र, चंद्रकांत पाटलांचं संतुलित वक्तव्य !

Dhananjay Munde and Manoj Jarange both are my friends, Chandrakant Patil’s balanced statement : नेमकं काय झालं माहिती नाही, पण दोघांनाही फोन करून विचारतो

Pune : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या धनंजय मुंडे आणि मनोज जरंगे पाटील यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरींंवर आता राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संतुलित प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे हे दोघेही माझे चांगले मित्र आहेत. नेमकं काय झालं, मला माहिती नाही. पण दोघांनाही फोन करून विचारतो. उगाच माहिती नसताना बोलण्यात अर्थ नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील हे आज (७ नोव्हेंबर) पुण्यात माध्यमांशी बोलत होते. अलीकडेच एका व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे यांचे निकटतम सहकारी दादा गरड यांनी केलेले एक वक्तव्य चर्चेत आलेले आहे. त्यामुळे या दोघांतील वाद आणखी तीव्र झाला आहे. मनोज जरांगे यांनी मुंडेंवर केलेल्या आरोपानंतर मुंडेंनीही त्यांना तोडीस तोड प्रत्यूउत्तर दिले. परिणामी मराठा आंदोलनाच्या चर्चेत नवे राजकीय वारे वाहू लागले आहेत.

Dhananjay Munde : मला राजकीय आणि सामाजिक जीवनातून संपवण्याचा षडयंत्र, मुंडेंचा प्रतिहल्ला !

या संदर्भात पत्रकारांनी अधिक विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, मी आधी चिंचवडकडे जातो. त्यानंतर दोघांनाही फोन करतो. नेमकं काय घडलं, हे समजून घेतल्याशिवाय कुठल्याही निष्कर्षाला येणं किंवा काही बोलणं योग्य नाही. दोघेही समाजासाठी काम करणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांच्याशी शांततेत चर्चा होणं आवश्यक आहे. चंद्रकांत पाटलांनी घेतलेला हा संतुलित आणि मध्यस्थीचा पवित्रा सत्ताधाऱ्यांमध्येही चर्चेचा विषय ठरला आहे. एका बाजूला धनंजय मुंडे हे राज्य सरकारमधील प्रभावशाली नेते मानले जातात. तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे हे मराठा आरक्षण चळवळीचे मुख्य नेते आहेत. त्यामुळे दोघांमधील वादाचा परिणाम सरकारवर आणि समाजावरही होऊ शकतो.

Local body election : व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या !

राजकीय विश्लेषकांच्या मते चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेकडे वाद शांत करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. मुंडे आणि जरांगे यांच्यातील वाद चिघळल्यास मराठा समाजाच्या भावनांवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे सरकार समोरही अडचणी निर्माण होऊ शकतात.