Local Body Elections : उलथापालथ झालीच, काकांचा उमेदवार पुतण्याच्या गळाला!

Candidate from Sharad Pawar’s faction joins Ajit Pawar’s party : निवडणुकीपूर्वी सिंदखेड राजात राजकीय भूकंप, शरद पवार गटाला मोठा धक्का

Sindkhed Raja नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर सिंदखेड राजाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. ‘राष्ट्रवादी शरद पवार’ पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्याम मेहेत्रे यांनी गुरुवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘राष्ट्रवादी अजित पवार’ गटात प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक राजकारणात एकाच पक्षाच्या दोन गटांतील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुंबईत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, पालकमंत्री मकरंद पाटील, आमदार मनोज कायंदे, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काजी आणि माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित पवार यांनी श्याम मेहेत्रे यांचे पक्षात स्वागत केले.

Local Body Elections : बुलढाण्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू!

श्याम मेहेत्रे हे डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे विश्वासू समर्थक मानले जातात. आगामी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून त्यांच्या नेतृत्वात लढाई होणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय खेळीने मेहेत्रे यांना अजित पवार गटात आणण्यात स्थानिक नेत्यांना यश मिळाले आहे.

Vidarbha farmers : कर्जमाफी द्या नाहीतर गांजा पिकवू द्या!

मेहेत्रेंच्या प्रवेशानंतर आता शहरातील शरद पवार गटातील काही ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी नगरसेवकदेखील अजित पवार गटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे सिंदखेड राजाच्या राजकारणात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची शक्यता असून, आगामी नगरपरिषद निवडणूक आता अधिकच रंगतदार होणार आहे.