व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local Body Election : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, समविचारी घटकांसोबत नव्या...

Local Body Election : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, समविचारी घटकांसोबत नव्या आघाडीची तयारी !

Sharad Pawar’s NCP’s big decision, preparation for a new alliance with like-minded elements : इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण, लवकरच जाहीर होणार पहिली यादी

Nagpur : नागपूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवणारा निर्णय शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. महाविकास आघाडीतून काँग्रेसने सहकार्याचा हात मागे घेतल्याने राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. उपराजधानीत झालेल्या पक्षाच्या जिल्हास्तरीय बैठकीत स्वतंत्र लढतीचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

या महत्त्वाच्या बैठकीला जिल्हा निवडणूक प्रभारी सलील देशमुख, जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील, युवक जिल्हाध्यक्ष दिनेश साळवे, प्रदेश युवक महासचिव शैलेंद्र तिवारी, तालुकाध्यक्ष सुधीर मोहोड, आणि शहराध्यक्ष राजेश भोयर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत महाविकास आघाडीतील अलीकडील मतभेद आणि काँग्रेसच्या भूमिकेचा सखोल आढावा घेण्यात आला. काँग्रेसकडून उमेदवारांच्या वाटपात सहकार्य न मिळाल्याने राष्ट्रवादीने “आता स्वतःच्या बळावर लढण्याचा निर्णय अटळ झाला आहे,” असा ठराव पारित केला.

Local body election : भाजपचा डाव दुहेरी; ठाकरेंनाही आणि शिंदेंनाही धक्का

“काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नाही, पण जनतेत राष्ट्रवादीचा विश्वास कायम आहे. त्यामुळे आम्ही इतर लहान घटक पक्ष, सामाजिक संघटना आणि समविचारी लोकांच्या सहकार्याने पर्यायी आघाडी उभारणार आहोत,” असे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी बैठकीत सांगितले. बैठकीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. त्यावर आधारित पहिली उमेदवार यादी काही दिवसांत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

Centenary of RSS : हिंदू असणं म्हणजे भारतासाठी जबाबदार असणं !

पक्षाने ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांसाठी वेगळी रणनीती आखण्याचे ठरवले आहे. राजकीय जाणकारांच्या मते, या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील स्थानिक स्तरावरील एकता धोक्यात आली असून काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो. शरद पवार गटाने काँग्रेसवर “बंडखोरांना प्रोत्साहन” आणि “संघटनात्मक दुर्लक्ष” केल्याचा आरोप आधीच केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसची ही स्वतंत्र लढत नागपूर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये नवा रंग आणणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. “लढा जनतेचा आणि तत्त्वांचा — साथ आमच्या विचारांची,” असे नवे रणघोष वाक्य पक्षाच्या बैठकीत ऐकायला मिळाले.

error: Content is protected !!