Local Body Elections : भाजपने रणशिंग फुंकले! बावनकुळे म्हणतात, ‘आम्हीच जिंकणार’

BJP Confident of Winning with 51 Percent Votes : ५१ टक्के मत घेऊन विजयी होण्याचा भाजपला विश्वास

Amravati आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने अमरावती जिल्ह्यात प्रचारयुद्धाची प्रभावी सुरुवात केली आहे. धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सुर्जी येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावे पार पडले.

या बैठकीत भाजपाचे महसूलमंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करत स्पष्ट संदेश दिला. या निवडणुकीत भाजप ५१ टक्के मतांसह विजयी होईल. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या वार्डमधील किमान दहा घरांची जबाबदारी स्वीकारावी आणि त्या घरांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवाव्यात,असे ते म्हणाले.

Local Body Elections : आजपासून धुमशान! न.पा.ची उमेदवारी ऑनलाइन; अनामत, प्रतिज्ञापत्र आवश्यक

पालकमंत्री बावनकुळे यांनी मेळाव्यात गटबाजीवर कठोर शब्दांत टीका केली. “पक्षाची दिशाभूल करणारा नेता असो की कार्यकर्ता, अशा व्यक्तींच्या घराची दारे पाच वर्षांसाठी बंद केली जातील, असा इशारा त्यांनी दिला. निवडणुकीत जर कोणी पक्षाशी दगा केला, तर त्याची पूर्ण जबाबदारी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने संघटनशक्ती दाखवावी, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. या मेळाव्यांमध्ये आमदार केवलराम काळे, आमदार प्रवीण तायडे, तसेच भाजप जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांनीही मार्गदर्शन केले.

Sudhir Mungantiwar : कळमना येथे साकारले आधुनिक ‘स्मार्ट’ प्राथमिक आरोग्य केंद्र !

मेळघाटापासून अचलपूरपर्यंत झालेल्या या बैठकींना कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात भाजपने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग औपचारिकपणे फुंकले असल्याचे स्पष्ट झाले आहे.