The bride collapsed on stage, Amravati was shaken : वधू स्टेजवरच कोसळली, अमरावती हादरली
Amravati : जिल्ह्यातील बडनेरा परिसरात लग्नाच्या स्टेजवर घडलेली थरारक घटना सध्या राज्यभर चर्चेत आहे. आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस असलेल्या लग्नसमारंभातच दोन अज्ञातांनी नवरदेवावर चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली असून, आरोपी हल्ला केल्यानंतर मोटारसायकलवरून पळून गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेव सुजलराम समुद्रे आणि वधूचा लग्नसोहळा बदनेरा रोडवरील साहिल लॉन येथे सुरु होता. याच वेळी दोन तरुणांनी स्टेजवर येताच नवरदेवावर चाकूने हल्ला केला. हल्ला इतका अचानक झाला की उपस्थित पाहुणे, वधू आणि कुटुंबीय थक्क झाले. डोळ्यांसमोर रक्तरंजित दृश्य पाहताच वधूला शॉक बसला आणि ती स्टेजवरच कोसळली.
Delhi Blast Case : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई;
घटनेनंतर लॉन परिसरात एकच आरडाओरड, गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. नवरदेव सुजलराम समुद्रे यांना तातडीने अमरावती येथील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
ड्रोन कॅमेऱ्यात संपूर्ण हल्ल्याचा व्हिडिओ स्पष्टपणे दिसत असून, दोन आरोपी नवरदेवावर वार केल्यानंतर पळून जाताना कैद झाले आहेत. नवरदेवाचे वडील आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या दिशेनेही चाकू फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बदनेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात नवरदेव सुजलराम समुद्रे हा तिलक नगर परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी काही पथके तयार केली आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
Municipal Corporation Election : अनेकांना बसला सोडतीचा फटका, दिग्गज नेते हादरले !
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे वैयक्तिक वैर किंवा पूर्वीचा वाद असण्याची शक्यता नाकारली जात नाही. मात्र, आरोपींचा अचूक शोध लागेपर्यंत पोलिसांनी अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे. सध्या अमरावती गुन्हे शाखा आणि बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
______








